27 May 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०८ नोव्हेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  मानसिक चंचलता जाणवेल. ध्यानधारणा करून पहावी. कामानिमित्त बाहेर गावी जाण्याचा योग येईल. प्रवास चांगला होईल. आध्यात्मिक बळ वाढेल.
 • वृषभ:-
  जवळचे मित्र भेटतील. कामात स्त्री वर्गाचा हातभार लागेल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होईल. स्वकष्टाने आकांक्षा पूर्ण कराल. मोठ्या लोकांच्या ओळखी वाढतील.
 • मिथुन:-
  उत्तम व्यावसायिक लाभ होईल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीला चांगला पर्याय मिळेल. कामातून इच्छित धनलाभ होईल. दिवस धावपळीत जाईल.
 • कर्क:-
  वडीलधाऱ्यांचा योग्य तो मान ठेवाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. धार्मिक कामात मदत कराल. हातातील कामात यश येईल. तुमच्यातील सज्जनपणा दिसून येईल.
 • सिंह:-
  मनाची दोलायमान अवस्था होईल. आपल्या निर्णयावर ठाम राहावे. फार विचार करत बसू नये. कफाचे विकार संभवतात. अचानक धनलाभ संभवतो.
 • कन्या:-
  उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कामात स्त्रियांची मदत घ्याल. भागीदारीत दिवस चांगला जाईल. तुमचा संपर्क वाढेल. रागावर नियंत्रण ठेवावे.
 • तूळ:-
  गप्पांमध्ये वेळ घालवाल. कामाची दगदग जाणवेल. कौटुंबिक गोष्टींचा विचार कराल. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. श्रमामुळे थकवा जाणवेल.
 • वृश्चिक:-
  चैनीच्या वस्तू खरेदी कराल. झोपेची तक्रार जाणवेल. सामुदायिक गोष्टींचे भान राखावे. काही कामे अडकून पडतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
 • धनु:-
  क्षणिक गोष्टींचा आनंद घ्याल. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. प्रगल्भ विचार मांडाल. मोठ्या लोकांची ओळख होईल. कामातील बदल स्वीकारा.
 • मकर:-
  उत्तम मानसिक शांतता मिळेल. सरकारी कामात अधिक लक्ष घालावे. तीर्थ यात्रेचे योग येतील. ऐशारामाच्या वस्तू खरेदी कराल. व्यावसायिक उत्पन्न वाढेल.
 • कुंभ:-
  आवड-निवड दर्शवाल. नवीन मित्र जोडावेत. कामातून समाधान मिळेल. मनाजोगी खरेदी करता येईल. अपेक्षा पूर्तीची इच्छा बाळगाल.
 • मीन:-
  मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. दिवस आनंदात जाईल. तुमच्या ज्ञानाचा सदुपयोग होईल. आरोग्यात सुधारणा होईल. छंद जोपासायला वेळ मिळेल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 12:07 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 08 november 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०७ नोव्हेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, ०६ नोव्हेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०५ नोव्हेंबर २०१९
Just Now!
X