• मेष:-
    प्रवासात फसवणुकीपासून सावध राहावे. भावंडांची चिंता सतावेल. आपली इच्छा पूर्ण कराल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. मन:शांती लाभेल.
  • वृषभ:-गृहसौख्याकडे लक्ष द्या. पचनाचा त्रास जाणवेल. पत्नीशी मतभेद संभवतात. तुमचे मत बाजूला सारावे लागेल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.
  • मिथुन:-
    मानसिक चंचलता जाणवेल. फार विचार करू नका. ध्यानधारणा करण्यात वेळ व्यतीत करावा. जोडीदाराशी गप्पा-गोष्टी कराव्यात. संपर्कातील लोक भेटतील.
  • कर्क:-
    मानसिक शांतता जपावी. विचारात वाहून जाऊ नका. मुलांचे प्रश्न सोडवाल. कामात सातत्य ठेवावे. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल.
  • सिंह:-
    जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. मुलांशी मतभेद संभवतात. बौद्धिक दृष्टिकोन ठेवावा. योग्य तारतम्यता बाळगाल. वाहन जपून चालवावे.
  • कन्या:-
    घरातील वातावरण आनंदी असेल. घरी पाहुणे जमा होतील. जुने मित्र भेटतील. कार्याला अधिक ऊर्जा मिळेल. अधिकारात वाढ होईल.
  • तूळ:-
    विरोधकांचा त्रास वाढेल. हातातील अधिकाराचा वापर करावा. शत्रुत्व ओढवून घेऊ नये. बोलतांना सारासार विचार करावा. आपला मान जपावा.
  • वृश्चिक:-
    त्रासातून अंतिम फळ हाती येईल. खर्चाचा मेळ घालावा. तब्बेतीची हयगय करून चालणार नाही. जबाबदारीने वागाल. कौटुंबिक प्रश्न हाताळाल.
  • धनु:-
    मनाची चंचलता दूर सारावी. मित्रांचा रोष ओढवून घेऊ नका. कामामुळे थकवा जाणवेल. वेळेचे योग्य नियोजन करावे. महत्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे.
  • मकर:-
    झोपेचा त्रास हळूहळू कमी होईल. कर्जाचा भानगडीत पडू नका. खर्चाचा ताळमेळ घालावा. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. नाविन्यपूर्ण विचार करावेत.
  • कुंभ:-
    उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रेम सौख्यात वाढ होईल. ओळखीने कामे करून घ्यावीत. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल. कामाचे प्रशस्तीपत्र मिळेल.
  • मीन:-
    लपवाछपवी करू नका. क्षणिक गोष्टींचा आनंद घ्याल. दिवस चैनीत घालवाल. मानसिक शांतता लाभेल. वरिष्ठांना खुश कराल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर