मेष:-आपल्या हातून चांगले काम घडेल. मानसिक अस्वस्थता जाणवू देऊ नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक परिस्थिती आहे. काही प्रसंगामुळे चिडचिड होऊ शकते. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

वृषभ:-कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. वातावरण आनंदी व उत्साही राहील. ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. संगीताचा, कलेचा आनंद घेऊ शकता.

मिथुन:-घरात वेगवेगळी कामे निघतील. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत सुस्थता लाभेल. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. हास्य-विनोदात दिवस जाईल.

कर्क:-शोधत असलेले काम पूर्ण होईल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. भेटवस्तू मिळण्याचे संकेत. मित्रांमुळे निराशा समाप्त होईल. एखादे चांगले साहित्य वाचनात येईल.

सिंह:-बोलण्यात अत्यंत मधुरता ठेवाल. सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. मनोबल वाढीस लागेल. आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

कन्या:-आपल्या कर्तृत्वाने कार्य सिद्धीस न्याल. मुद्दा मांडताना गाफिल राहू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. मिळकतीत वाढ संभवते. काही जुने मतभेद मिटू शकतील.

तूळ:-बरेच दिवस राहून गेलेला प्रवास कराल. एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते. कामाची दगदग राहील. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. अचानक खर्चात वाढ होऊ शकते.

वृश्चिक:-गोष्टी मनाप्रमाणे घडतील. जुनी उधारी वसूल होईल. पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल. जुनी कामे पूर्णत्वास जातील. तज्ञ व्यक्तींचे सहकार्य मिळेल.

धनू:-दूरच्या नातेवाईकांशी गप्पा माराल. व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल. कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील. बोलताना तारतम्य बाळगा. कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद संभवतात.

मकर:-आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. घरात अनावश्यक खर्च निघेल. प्रवासात काळजी घ्यावी. विरोधक नामोहरम होतील. दानधर्म कराल.

कुंभ:-आलेल्या संधीचा लाभ उठवा. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. रागावर नियंत्रण ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

मीन:-नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धर्म-कार्यात आस्था वाढेल. डागडुजीवर खर्च होऊ शकतो. जवळच्या मित्रांशी भेट शक्य.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर