24 September 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १३ सप्टेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  मनात नवीन आकांक्षा फुलतील. गृहसौख्याचा आनंद घ्याल. विचारांना सकारात्मकतेची जोड द्याल. मुलांचे म्हणणे समजून घ्यावे. महिलांनी घरातील ताण दूर करावा.
 • वृषभ:-
  वाहन विषयक तक्रारी दूर कराव्यात. मंगल कार्यात भाग घ्याल. व्यावसायिक दृष्टीकोनातून सुट्टीचा विचार कराल. घर सजवण्यासाठी वेळ काढाल. मानहानीचे प्रसंग येवू शकतात.
 • मिथुन:-
  घरासंबंधीच्या कामात अधिक लक्ष घालावे. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. बढतीच्या कामाकडे लक्ष द्यावे. जोडीदाराला आर्थिक लाभ संभवतो. किरकोळ कटकटी दूर कराव्यात.
 • कर्क:-
  वेगवेगळी सुखे आपल्या समोर येतील. हातातील कलेला उत्तम दिशा लाभेल. लेखन कलेला चांगला वाव मिळेल. मंगल कार्यात सहभाग नोंदवाल. घरासाठी विविध वस्तू खरेदी कराल.
 • सिंह:-
  जोडीदाराच्या प्रेमात रंगून जाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कामाचा अति ताण घेवू नका. दगदगीपेक्षा स्थिर कामावर अधिक लक्ष द्यावे. उत्साहाच्या भारत शब्द देवू नका.
 • कन्या:-
  झोपेची तक्रार जाणवेल. जनक्षोभात अडकू नका. एका वेळी अनेक कामे हाती घेणे टाळावे. आर्थिक चिंता मिटेल. काही गोष्टी मनाजोग्या घडतील.
 • तूळ:-
  लपवाछपवी करावी लागेल. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. खोट्या गोष्टींमध्ये अडकू नका. मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. बदलाकडे सकारात्मकतेने पहावे.
 • वृश्चिक:-
  घरगुती कार्यक्रम मजेत पार पडेल. सरकारी कामे रेंगाळू शकतात. वरिष्ठांच्या नाराजीला बळी पडू नका. हट्टीपणा कमी करावा. अधिकारी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे.
 • धनु:-
  प्रवासाचा योग येईल. वडिलधाऱ्यांचा सल्ला विचारात घ्यावा. सहकाऱ्यांना बरोबर घेवून चालावे. चिकाटी सोडून चालणार नाही. इतरांसमोर आपली कला सादर करण्याचा योग येईल.
 • मकर:-
  तिखट व तामसी पदार्थ खाणे टाळावे. पाठीचे विकार त्रास देवू शकतात. महत्त्वाच्या कामात प्रथम लक्ष घालावे. प्रकृतीची हेळसांड करू नका. इतरांच्या मताला योग्य वाव द्याल.
 • कुंभ:-
  तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कामाची घाई राहील. जोडीदाराविषयी गैरसमजाला मनात थारा देवू नये. कफविकार जाणवू शकतात. कौटुंबिक शांततेवर लक्ष द्यावे.
 • मीन:-
  पत्नीशी मनमोकळ्या गप्पा माराल. भागीदारीत चांगला फायदा संभवतो. व्यवहारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कमिशनच्या कामातून फायदा संभवतो. तुमचा जनसंपर्क वाढेल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 13 september 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवारी, १२ सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, ११ सप्टेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १० सप्टेंबर २०१९
Just Now!
X