मेष

ॐ भिमरूपाय नमः. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाचे योग संभवतात. जुने मित्र मंडळी भेटतील.
आजचा रंग –आकाशी

वृषभ

ॐ वासुदेवदेवकीनंदनाय नमः. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. अधिकार प्राप्त होतील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. महत्त्वाच्या कामामध्ये तुमचा सहभाग असेल. अधिकारी वर्गांनी सावधपणे निर्णय घ्यावेत. वाहन सौख्य लाभेल.
आजचा रंग – निळा

मिथुन

ॐ दयानिधये नमः. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये नवीन दिशा मिळेल. जुन्या योजना राबविण्याच्या दृष्टीने ग्रहमान योग्य आहे. जमिनीशी, पाण्याशी, रसायनांशी निगडीत व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहेत. परदेशांशी निगडीत व्यावसायिकांना उत्तम ग्रहमान आहे.
आजचा रंग –करडा

कर्क

ॐ परमानंदाय नमः. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवावा. वाहने जपून चालवावी.
आजचा रंग –नारंगी

सिंह

ॐ पराय नमः. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेचे, पचनाचे विकार असलेल्यांनी विशेष दक्षता घ्यावी. वाहने जपून चालवावीत.
आजचा रंग -हिरवा

कन्या

पशुपालकांना अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. सर्वांचे सहकार्य लाभेल. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करतााना सावधानता बाळगावी. कायदेशीर गोष्टींमध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत. वरिष्ठांची मर्जी राखावी.
आजचा रंग –राखाडी

तुळ

ॐ प्रशांताय नमः. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. धाडसी निर्णय घेऊ शकाल. मोठ्या निर्णयाचा पाठपुरावा करता येईल. महत्वाकांक्षी योजना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूलता प्राप्त होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जुने मित्र भेटतील.
आजचा रंग -जांभळा

वृश्चिक

ॐ अंबिकायै नमः. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस. आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ जाईल. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग आहेत. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहेत. बांधकाम, शेती, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणा-यांसाठी आजचे ग्रहमान अनुकूल आहेत.
आजचा रंग –गुलाबी

धनु

ॐ दत्तात्रयाय नमः. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. व्यावसायिक स्पर्धेला सामोरे जावे लागेल. नोकरदार मंडळीनी वरिष्ठांची मर्जी सांभाळून वागावे. विद्यार्थी, गृहिणींना नवीन संधी उपलब्ध होतील. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ घालवाल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –लाल

मकर

ॐ सनातनाय नमः. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल करता येतील. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणा-यांसाठी उत्तम ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये महत्वाकांक्षी योजना राबवू शकाल.
आजचा रंग –निळा

कुंभ

ॐ शेषशायिने नमः. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे. महत्वाकांक्षी योजना राबवू शकाल. व्यवसाय, नोकरीमध्ये सुसंधी उपलब्ध होतील. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. शेती, लोखंड, रसायनांमध्ये गुंतवणूक करणा-यांसाठी उत्तम ग्रहमान आहे.
आजचा रंग- ऑफ व्हाइट

मीन

आॐ गणनायकाय नमः. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. मोठे आर्थिक नियोजन सावधानपणे करावेत. सर्वांशी सलोखा ठेवावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. नोकरदार मंडळींना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागेल, त्यामुळे चित्त स्थिर ठेवावे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu