1. मेष:-
    कामातून समाधान शोधाल. जवळचे नातेवाईक भेटतील. प्रेमविवाहात सबुरीने घ्यावे. वारसाहक्काची कामे निघतील. जुनी येणी वसूल होतील.
  2. वृषभ:-
    प्रवासातील अडचणी दूर कराव्यात. घरासाठी दगदग वाढेल. सकारात्मक विचारांनी वाटचाल करावी. मोठ्या लोकांची गाठ पडेल. अंगीभूत कला सादर करता येईल.
  3. मिथुन:-
    आशावादी दृष्टिकोन ठेवावा. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. परोपकाराची जाणीव ठेवाल. मनात नसते मांडे रचू नका. घरात नातेवाईक गोळा होतील.
  4. कर्क:-
    प्रेमात फसवणुकीची शक्यता. वरिष्ठांच्या जास्त पुढे करू नका. धोरणीपणाने वागाल. नातेवाईकांकडून विरोध होवू शकतो. प्रलोभनात वाहवत जाऊ नये.
  5. सिंह:-
    आवडीचे पदार्थ चाखाल. मुलांना योग्य प्रशिक्षण घेता येईल. अकारण ताणतणावाला बळी पडू नका. आरोग्यात सुधारणा होईल. जबाबदारीत वाढ होईल.
  6. कन्या:-
    आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. नियमांचे काटेकोर पालन करावे. वाहनांवरील वेग नियंत्रित ठेवावा. हाताखालील लोकांचे प्रश्न नीट हाताळावेत.
  7. तूळ:-
    घरातील कुरबुरी दूर कराव्यात. जोडीदाराची प्रगती होईल. स्थावर संबंधीचे प्रश्न सोडवावेत. आधुनिक विचारांची जोड घ्यावी. सरकारी योजनेचा लाभ घ्यावा.
  8. वृश्चिक:-
    आततायीपणे वागू नये. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नयेत. आत्मविश्वासाने वाटचाल करता येईल. रखडलेली कामे उरकून घ्यावीत. कौटुंबिक बाबतीत दिलासा मिळेल.
  9. धनू:-
    आर्थिक व्यवहार सबुरीने करावेत. नवीन दृष्टिकोन ठेवावा. सामाजिक बाबीत फार लक्ष घालू नका. सहलीचे आयोजन कराल. लोकोपयोगी कामे कराल.
  10. मकर:-
    मानसिक त्रास काहीसा वाढू शकतो. कामाच्या वेळा सांभाळाव्यात. गप्पागोष्टींमध्ये वेळ घालवाल. चित्त चांचल्य जाणवेल. अडथळ्यातून मार्ग काढाल.
  11. कुंभ:-
    झोपेची तक्रार जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढू शकते. मनात उगाचच चिंता लागून राहील. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. निराशा दूर सारावी.
  12. मीन:-
    अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. थोरांच्या सहवासात लाभेल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. व्यावसायिक वाढीचा विचार करावा. कामाच्या ठिकाणी मान वाढेल.
    या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 17 january 2020 aau
First published on: 17-01-2020 at 01:00 IST