मेष

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको. कुलस्वामिनी मंदिरात पांढऱ्या फुलांचा गजरा अर्पण करणे.
आजचा रंग – जांभळा

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. कौटुंबिक सौख्य जाणवेल. नवविवाहितासाठी चांगला दिवस आहे. व्यवसायाशी निगडित एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आर्थिक नियोजन उत्तम राहील. लक्ष्मी अष्टकांचे पाठ करावेत.
आजचा रंग – पांढरा

10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
Surya Grahan 12 Rashi Horoscope Today
८ एप्रिल पंचांग: सूर्यग्रहणाला तुमच्या राशीच्या कुंडलीत आनंद की निराशा, १२ राशींना वर्षाचा शेवटचा दिवस कसा जाईल?
Good Friday: 29th March Panchang & Rashi Bhavishya
२९ मार्च पंचांग: कर्क, मीनसह ‘या’ राशींच्या लोकांचं आज चारचौघात होईल कौतुक; शुक्रवारी कुणाला लाभेल वैभव
Rahu And Shukra Conjunction
होळीनंतर राहू-शुक्रची होणार युती! या राशीच्या लोकांच्या आयुष्यात येईल आनंद, धनलाभासह मिळेल नव्या नोकरीची संधी

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंचना राहतील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. ग्रामदैवतेला धान्य आणि फुले अर्पण करावी.
आजचा रंग- तपकिरी

कर्क

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. मुलांशी निगडित किंवा घरातील धाकट्या भावंडाशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणीमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. लक्ष्मी अष्टक सकाळी आणि संध्याकाळ म्हणणे.
आजचे रंग – निळा

सिंह

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरुवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकते. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि उपवास करावा.
आजचा रंग- जांभळा

कन्या

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. भावंडाशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील. ओम श्री नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – नारंगी

तुळ

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांना उत्तम दिवस. छोट्या प्रवासााचे योग संभवतात. कुलस्वामिनी दर्शन घ्यावे.
आजचा रंग – जांभळा

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. आजचे ग्रहमान सर्वकामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

धनु

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांशी मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत. गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करावा.
आजचा रंग – आकाशी

मकर

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. सर्व प्रकारच्या लाभासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस उत्तम आहे. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम आहे. गणपती मंदिरामध्ये हिरवे धान्य अर्पण करणे.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल. सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम आहे.
आजचा रंग – पांढरा

मीन

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत. कुलस्वामिनीच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पोपटी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu