News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १८ डिसेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष : आज कुटुंबियांच्या इच्छा आपण पूर्ण कराल. नोकरी-व्यवसायात बढती-बदलीचे योग आहेत. विद्यार्थ्याना शैक्षणिकबाबतीत अडचणी येण्याची शक्यता आहे. परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.

वृषभ : आजचा दिवस आपल्याला भाग्योद्याच्या दृष्टीने अनुकूल आहे आज नोकरीनिमित्त परदेशगमन होण्याचा योग आहे.संतती संबंधी चिंता जाणवतील. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जनसंपर्कातून चांगला फायदा होईल.

मिथुन : आज आपल्या घरातील त्रीवर्गाच्या उन्नतीस अनुकूल दिवस आहे. परदेशात असलेल्या आपल्या संततीची आज भेटघडेल. आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा. तुमचा सरळ स्वभाव आणि मजबूत व्यक्तिमत्व या जोरावर तुम्ही कठीण प्रसंगातून  सहज बाहेर पडाल.

कर्क : भागिदारीत व्यवसाय करणार्यांचे कार्यक्षेत्र वाढण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आज आपल्याला संततीच्याउत्कर्षाची बातमी समजेल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावणार्या घटना घडतील. आपल्या मतांचा आदर केला जाईल.

सिंह : व्यावसायिक मतभेद टाळावेत. आज आपले विचार प्रकट करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तिचे म्हणणे ऐकून घ्या. आजआपल्याला अनपेक्षित लाभ संभवतात. योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. गृहसुशोभिकरणासाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल.

कन्या : आज आपल्याला घरगुती कामानिमित्त प्रवासयोग करावे लागतील. संततीच्या उत्कर्षाच्या दृष्टीने आजचा दिणवसअनुकूल आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत. परप्रांताशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित करता येतील. शेजार्यांचे सहकार्य लाभेल.

तूळ : आपल्या हातून घडलेल्या सुंदर कलाकुसरीला सभोवतालच्या व्यक्तिंकडून उत्तम दाद मिळेल. आपले कलाक्षेत्र वाढण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आपल्या कामात मित्रपरिवाराचा सल्ला घेऊ नका. उधारी उसनवारी वसूल होईल. अनपेक्षित धनलाभ झाल्याने आश्चर्याचा धक्का बसेल.

वृश्चिक : आपली कामे करताना सावधगिरी बाळगा, वरिष्ठांना बोलण्यास संधी देऊ नका. व्यावसायिक दृष्टीकोनातून प्रगतीकारक घटना घडतील. घरात गोडीगुलाबीचे वातावरण राहिल. कामाची आखणी नियोजनबद्ध केल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष साधता येईल. प्रतिष्ठित व्यक्तींचे सहकार्य लाभेल.

धनू : आज आपल्या संततीच्या नोकरीसंबंधीची सुवार्ता आपल्या कानी येईल. तीर्थक्षेत्राला भेट देण्याच्या दृष्टीने आजचादिवस अनुकूल आहे. आज आपल्या हातून धार्मिक कार्ये घडतील. व्यवसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल. हौसे मौजेखातर खर्च कराल.

मकर : व्यावसायिक क्षेत्रात आपल्या मतांचा प्रभाव पडेल. त्यावर तात्काळ अंमलबजावणी होईल. याचा उपयोग आपलेकार्यक्षेत्र वाढण्यासाठी होईल. आपल्या सहकार्यांचे सहकार्य मोलाचे ठरेल. मित्रपरिवाराबरोबर करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल.

कुंभ : नोकरीत सहकार्यांवर अवलंबून राहू नका. आपले काम स्वतःच पुर्ण करा. आपले अंदाज अचूक ठरतील. नोकरीत वरिष्ठांकडून आपल्यावर कामाची जबाबदारी सोपविली जाईल. धाडसी निर्णय घेतले जातील.

मीन :आज आपल्या संततीची इच्छा पूर्ण कराल. घरासंबंधीची कर्तव्ये पार पाडाल. मित्रपरिवाराकडून आपल्याला विविधप्रकारचे लाभ होतील. कल्पनाशक्तीला वाव देणार्या घटना घडतील. सरकारी कामात योग्य प्रगती होईल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2020 12:07 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 18 december 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, १७ डिसेंबर २०२०
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, १६ डिसेंबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १५ डिसेंबर २०२०
Just Now!
X