05 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १८ ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  तुमचे कोडकौतुक केले जाईल. कुटुंबातील सर्वांना आपलेसे कराल. चांगला आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. गुंतवणुकीचा पर्याय शोधाल.
 • वृषभ:-
  आवडत्या वस्तू खरेदी कराल. तुमच्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वाची चांगली छाप पडेल. मधूरवाणीने सर्वांना जिंकून घ्याल. भावंडांची मदत मिळेल. लिखाणाला पुरेसा वेळ मिळेल.
 • मिथुन:-
  ध्यानधारणा करावी लागेल. कोणत्याही गोष्टीचा फार विचार करू नका. स्वत:साठी पुरेसा वेळ द्यावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. चित्त स्थिर ठेवावे.
 • कर्क:-
  जवळचे मित्र जमवाल. गप्पा गोष्टींचा फड जमेल. दिवस मनाप्रमाणे व्यतीत करता येईल. उत्कृष्ट व्यावसायिक लाभ संभवतो. स्त्रीसमुहात वावराल.
 • सिंह:-
  तुमच्यातील प्रतिभेला स्फूर्ती मिळेल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. कामातून आनंद मिळेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल.
 • कन्या:-
  उताविळपणा करून चालणार नाही. हातातील कामावर अधिक लक्ष द्यावे. चिडचिडेपणा बाजूला सारावा लागेल. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. तिखट पदार्थ खाणे टाळावे.
 • तूळ:-
  कोर्टाची कामे निघू शकतात. सामाजिक वादात अडकू नका. गैरसमजुतीमुळे मानसिक त्रास वाढू शकतो. जुनी प्रकरणे सामोरी येवू शकतात. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.
 • वृश्चिक:-
  झोपेची तक्रार जाणवू शकते. निराशा बाजूला सारून विचार करावा. काही ठिकाणी अडकून पडल्यासारखे वाटू शकते. आवक-जावक यांचा मेळ घालावा लागेल. चित्त चांचल्य जाणवेल.
 • धनु:-
  कामे मनाजोगी पार पडतील. जवळचे नातेवाईक भेटतील. मानसिक स्थैर्य मिळेल. मनाजोग्या कामामुळे समाधान लाभेल. आध्यात्मिक बळ वाढेल.
 • मकर:-
  मुलांबरोबर खेळण्यात वेळ घालवाल. ज्ञानाचा योग्य ठिकाणी वापर करायला मिळेल. जोडीदाराशी मैत्रीपूर्ण संवाद साधता येईल. कामातील खंड दूर करण्याचा प्रयत्न करावा. आवडते साहित्य वाचाल.
 • कुंभ:-
  घरातील वातावरणात रमून जाल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या सहवासात आनंद मिळेल. बागकामाची आवड जोपासाल. सर्वांचे आपुलकीने कराल. नवीन मित्र जोडाल.
 • मीन:-
  जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. तुमचे संपर्क वाढतील. नवीन लोकांच्या ओळखीतून मैत्री वाढेल. हस्तकलेचा आनंद घ्याल. भावंडांकडून कौतुक केले जाईल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 18 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, १७ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, १६ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १५ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X