05 April 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २० मार्च २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष:-
    वयाने लहान असणार्‍या लोकांशी मैत्री कराल. गप्पीष्ट लोकांच्यात वावराल. कामाचे योग्य नियोजन कराल. जोडीदाराच्या साथीत रमून जाल. इतरांना सहृदयतेने मदत कराल.
  2. वृषभ:-
    व्यावसायिक ज्ञान वाढवाल. लेखक, प्राध्यापक यांना प्रगती करता येईल. व्यवहारी हजरजबाबीपणा दाखवाल. हुशारीने स्वत:च फायदा काढून घ्याल. योग्य कल्पकता दाखवाल.
  3. मिथुन:-
    कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण राहील. तुमच्या वक्तृत्वावर लोक खूश होतील. धोरणीपणे वागणे ठेवाल. काही गोष्टींची शिस्त बाळगावी लागेल. प्रवासाची आवड पूर्ण कराल.
  4. कर्क:-
    भावंडांच्या वागण्याचा सखोल विचार कराल. मेंदूला जरासा ताण द्यावा लागेल. कफाचे त्रास संभवतात. अतिविचारात वेळ वाया जाईल. योग्य अनुमान काढावे.
  5. सिंह:-
    पत्नीची व्यवहार कुशलता दिसून येईल. जोडीदाराच्या सुस्वभावीपणाचे कौतूक कराल. मानसिक स्थिरता जपावी. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. विरोधकांवर मात करता येईल.
  6. कन्या:-
    फसवेपणाचा आधार घेऊ नका. इतरांच्या विश्वासास पात्र व्हावे. जुनी भांडणे उकरून काढली जातील. कोणाचाही सल्ला चटकन मान्य करू नका. अविचाराने त्रास वाढू शकतो.
  7. तूळ:-
    बौद्धिक क्षेत्रात काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल. खोट्या गोष्टींचा विरोध करावा. घरगुती शांतता जपावी. प्रवास त्रासदायक ठरू शकतो. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.
  8. वृश्चिक:-
    संभाषणात बाजी माराल. नवीन मित्र जोडले जातील. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्यातील प्रेमळपणा दाखवून द्यावा. भावंडांचे वागणे विरोधी वाटू शकते.
  9. धनू:-
    तुमच्यातील अहंमन्यता वाढू देवू नका. मनाची चलबिचलता सांभाळावी. काही खर्च आटोक्यात ठेवावेत. वैचारिक चलाखी दाखवाल. नवीन गोष्टीत रुची दाखवाल.
  10. मकर:-
    स्थिरविचार करावेत. बोलतांना सावधगिरी बाळगावी. कलेसाठी वेळ काढाल. धार्मिक ठिकाणी मदत कराल. गैरसमजातून वाद वाढू देवू नका.
  11. कुंभ:-
    गोष्टींचे आकलन चटकन होईल. बुद्धिचातुर्याने वागाल. स्मरणशक्तीचा चांगला फायदा होईल. अभ्यासूपणे गोष्टी जाणून घ्याल. हसत-हसत संभाषण कराल.
  12. मीन:-
    उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. बढतीचा योग येईल. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. उधारीचे व्यवहार तूर्तास टाळावेत.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2020 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 20th march 2020 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, १९ मार्च २०२०
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, १८ मार्च २०२०
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १७ मार्च २०२०
Just Now!
X