मेष

आज दुपारी दोन पर्यंत चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम दिवस. मोठे निर्णय राबवण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील. दुर्गा कवचाचे पाठ करणे.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

आज दुपारी दोन पर्यंत चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. दगदगीचा दिवस परंतु चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्यांचा पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण राहील. धाडसी निर्णय घेताना चर्चा करावी. ओम आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – फिकट पिवळा

मिथुन

आज दुपारी दोन पर्यंत चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. प्रवास जपून करावेत. वादविवाद टाळावेत. ग्रामदैवतेचे स्मरण करणे.
आजचा रंग – आकाशी

कर्क

आज दुपारी दोन पर्यंत चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्याचा दिवस. परदेशी प्रवासाचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक वातावरण राहील. ओम श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – निळा

सिंह

आज दुपारी दोन पर्यंत चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. गृहिणींनी आणि ज्येष्ठांनी उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी. प्रवासाचे योग संभवतात. खर्च संभवतो. कुलस्वामिनीचे स्तोत्र पठण करणे.
आजचा रंग – जांभळा

कन्या

आज दुपारी दोन पर्यंत चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. महत्त्वाकांक्षी योजना राबवू शकाल. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. संतती सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिकांना उत्तम दिवस. आर्थिक स्थिती उत्तम राहील. ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – जांभळा

तुळ

आज दुपारी दोन पर्यंत चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. आनंदी ग्रहमान, कुटुंबाशी निगडिच एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. राहत्या घराचे प्रश्न मार्गी लागतील. दत्त मंदिरात पांढरी फुले अर्पण करणे. ओम अदभ्यो नमः जप करुन दिवसाला सुरुवात करणे.
आजचा रंग – जांभळा

वृश्चिक

आज दुपारी दोन पर्यंत चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. भावंडाच्या गाठीभेटी होतील. आज धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा लाभ होईल. ओम श्री महालक्ष्मै नमः हा जप करणे.
आजचा रंग – गुलाबी

धनु

आज दुपारी दोन पर्यंत चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसुली करण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम अदभ्यो नमः या मंत्राचा ११ वेळा जप करणे.
आजचा रंग – हिरवा

मकर

आज दुपारी दोन पर्यंत चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यासाठी त्यांची आखणी करण्यासाठी योग्य दिवस. महत्त्वकांक्षी योजना सुरू करण्यासाठी त्यांची आखणी करण्यासाठी योग्य दिवस. ओम अदभ्यो नमः जप करावा.
आजचा रंग – पोपटी

कुंभ

आज दुपारी दोन पर्यंत चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. लक्ष्मी अष्टकाचा पाठ करणे.
आजचा रंग – हिरवा

मीन

आज दुपारी दोन पर्यंत चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. सर्व लाभांच्या दृष्टीने योग्य दिवस. भावंडाच्या भेटी गाठीचे योग. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. ओम द्रां दत्तात्रयाय नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – पोपटी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu