25 September 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

  • मेष:-मन:स्वास्थ्य बिघडू देऊ नका. आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. क्षुल्लक गोष्टींचा फार विचार करू नका. मुलांची काळजी लागून राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.
  • वृषभ:-ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. आवडीची कामे करायला वेळ मिळेल. जुगाराची आवड पूर्ण करता येईल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. आपला मूड बिघडणार नाही याची काळजी घ्या.
  • मिथुन:-अवास्तव चर्चा करू नका. सत्याची कास सोडू नका. मित्रांशी सुसंवाद साधावा. घरातील वातावरण हसते-खेळते ठेवाल. आपली हौस पूर्ण करून घ्याल.
  • कर्क:-जोडीदाराच्या वर्तनाने ताण वाढू शकतो. सरसकट एकच विचार करू नका. हातातील कामात यश येईल. बदलांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे. भावंडांची उत्तम साथ मिळेल.
  • सिंह:-बोलताना शब्दांचे वजन लक्षात घेऊन बोला. आपलेच मत खरे करायला जाऊ नका. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आवडते पदार्थ खायला मिळतील. गोड बोलून कामे साध्य करता येतील.
  • कन्या:-अनावश्यक खर्चाला आवर घालावी लागेल. कागदपत्रे नीट तपासून घ्यावीत. जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत जाईल.
  • तूळ:-मानसिक तोल ढळू देऊ नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. कलेच्या क्षेत्रात काहीतरी नवीन शिकायला मिळेल. जोडीदाराच्या मताला पुष्टी द्याल. काही तडजोडी कराव्या लागतील.
  • वृश्चिक:-मनातील इच्छेला अधिक प्राधान्य द्याल. कामात पळवाट शोधून चालणार नाही. दिवस संमिश्र राहील. पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.
  • धनू:-अनावश्यक सल्ले देऊ नका. मुलांच्या तक्रारी वाढू शकतात. त्यांची बाजू समजून घ्यावी लागेल. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. जोडीदाराविषयी संभ्रम दूर होईल.
  • मकर:-संपूर्ण माहितीशिवाय वक्तव्य करू नका. उगाच जुन्या गोष्टीत उकरून काढत बसू नका. योग्य आहार घ्यावा. घरातील गोष्टी संयमाने हाताळाव्यात. शक्यतो वादविवादात पडू नका.
  • कुंभ:-नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. उष्णतेचे त्रास संभवतात. कामात किरकोळ समस्या जाणवू शकतात. मनाची द्विधावस्था होऊ शकते. अति विचार करू नका.
  • मीन:-चेष्टा जपून करावी. वेळ पाळणे खूप गरजेचे आहे. कौटुंबिक घडी सांभाळावी. आर्थिक बाबीत आततायीपणे वागू नका. बोलताना भडक शब्दांचा वापर करू नका.

          -ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 12:25 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 21st august 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २० ऑगस्ट २०२०
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, १९ ऑगस्ट २०२०
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १८ ऑगस्ट २०२०
Just Now!
X