• मेष:-
    कामे सुरळीत पार पडतील. जोडीदाराच्या होकारात होकार मिसळावा लागेल. मुलांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नये. मानसिक चंचलता जाणवेल.
  • वृषभ:-
    पैज जिंकता येईल. जुगाराची आवड पूर्ण कराल. बैठे खेळ खेळाल. सिनेमा, नाटक पाहायला जाण्याचा बेत आखाल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
  • मिथुन:-
    घरातील कामांची जबाबदारी घ्यावी. नातेवाईक गोळा होतील. गप्पांमध्ये दिवस घालवाल. कामात द्विधावस्था आड येईल. विचारांची दिशा बदलून पहावी.
  • कर्क:-
    जवळचा प्रवास कराल. भावंडांची भेट घेता येईल. सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळेल. घरातील गोष्टींचा नीट विचार करावा. एखाद्याशी शाब्दिक चकमक उडू शकते.
  • सिंह:-
    उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. मानाजोगे पदार्थ खायला मिळतील. दुचाकी वाहन चालविताना काळजी घ्यावी. मित्रांशी वादात पडू नका. काही अनपेक्षित जबाबदारी येऊ शकते.
  • कन्या:-
    दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. कोणतीही कृती करतांना सारासार विचार करावा. खर्चाकडे लक्ष द्यावे. आरोग्यात सुधारणा होईल. काही ठिकाणी धाडस दाखवावे लागेल.
  • तूळ:-
    कामानिमित्त दूर गावी जावे लागेल. शारीरिक श्रम वाढू शकतात. हेकटपणा करू नये. पित्त विकार बळावू शकतात. तुमच्या कामाला विरोध दर्शविला जाऊ शकतो.
  • वृश्चिक:-
    अति श्रमामुळे थकवा जाणवेल. मानसिक त्रास कमी करण्याचा प्रयत्न करावा. मानापमानात अडकून राहू नये. अडथळ्यातून मार्ग काढावा. काही कामे वेळेत होणार नाहीत.
  • धनु:-
    कौटुंबिक सौख्य वाढेल. कामात प्रगतीला वाव आहे. एकावेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. मैत्रीत दुरावा संभवतो. जवळच्या मित्रांचा राग घालवावा लागेल.
  • मकर:-
    ओळखीतून कामे पार पडतील. काही कामात अधिक श्रम पडतील. उगाच कोणाशीही शत्रुत्व घेऊ नका. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
  • कुंभ:-
    अचानक धनलाभ संभवतो. बढतीसाठी प्रयत्न करावेत. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. व्यवसायातून चांगला धनलाभ संभवतो. कामाचे प्रशस्तीपत्र मिळेल.
  • मीन:-
    मानसिक चंचलता जाणवेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. उत्तम वैवाहिक सौख्याचा लाभ होईल. भागीदारीतून फायदा संभवतो. तुमच्या ओळखी वाढतील.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर