मेष
कुलस्वामिनीच्या दर्शनाने दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाश चालवावीत.
आजचा रंग – पिवळा

वृषभ
गणपती मंदिरात लाल, तांबडी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत असेल. महत्वकांक्षी निर्णयांचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरदारांना बदलांची शक्यता. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – नारंगी

मिथुन
गणपती मंदिरात हिरवे धान्य अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत असेल. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणे मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
आजचा रंग – हिरवा

कर्क
गणपती अथर्व शीर्षाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत असेल. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पोपटी

सिंह
कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत असेल. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – गुलाबी

कन्या
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – लाल

तुळ
ओम श्री नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत असेल. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि उपवास करावा. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – आकाशी

धनु
लक्ष्मी अष्टक सकाळी आणि संध्याकाळी म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत असेल. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी, शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – पांढरा

मकर
ग्रामदैवतेला धान्य आणि फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत असेल. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – नारंगी

कुंभ
लक्ष्मी अष्टकाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत असेल. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग- लाल

मीन
कुलस्वामिनी मंदिरात पांढरी फुले, गजरा अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत असेल. व्यावसायिक प्रगतीचे दिवस. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – निळा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu