मेष

दुर्गा-कवचाचे पाठ करावे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमध्ये व्यवसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद होईल. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबद्ध दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग –आकाशी

वृषभ

ओम आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग – निळा

मिथुन

ग्रामदैवतेचे स्मरण करावे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यवसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –करडा

कर्क

ओम श्री आदि गुरवे नमः मंत्राचा जप करावा. अधिकार संपन्नता येईल. उत्तम आर्थिक नियोजन करु शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरु बदलाचा लाभ होईल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –नारंगी

सिंह

कुलस्वामिनीचे स्तोत्र पठण करावा. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबवता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग -जांभळा

कन्या

ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर मार्केट व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –हिरवा

तुळ

ओम अदभ्यो नमः जप करुन दिवसाची सुरुवात करावी. अडचणींवर मात करु शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती, पत्नींमधील दुरावा कमी होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग -जांभळा

वृश्चिक

ओम श्री महालक्ष्मे नमः या मंत्राचा जप करावा. आर्थिक नियोजन सावधपणे करावेत. कुठल्याही स्वरुपाचे वादविवाद टाळावेत. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग –गुलाबी

धनु

ओम अदभ्यो नमः या मंत्राचा ११ वेळा जप करावा. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निणर्य घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग –लाल

मकर

ओम अदभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहेत. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग –निळा

कुंभ

ओम क्लीं श्रीं नमः मंत्राचा जप करावा. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहेत. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करु शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग- ऑफ व्हाइट

मीन

पशुपक्षांना अन्नदान करावे. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. व्यवसायिकांना आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग –पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu