News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २७ डिसेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

  • मेष:-
    महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. लिखाण जपून करावे. शिस्तीचे धोरण ठेवाल. प्रवासात काळजी घ्यावी. बोलण्यातून चांगली छाप पडाल.
  • वृषभ:-
    जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. पारंपरिक व्यवसायात लक्ष घालावे. मानसिक व्यग्रता जाणवेल. सर्वांशी सहृदयतेने वागाल. भागीदाराशी सलोखा ठेवावा.
  • मिथुन:-
    जोडीदाराची प्रगती होईल. भागीदाराचा विश्वास संपादन करावा. पोटाची काळजी घ्यावी. गैरसमजाला खतपाणी घालू नका. कामात चालढकल करू नका.
  • कर्क:-
    मनाची शांतता जपावी. मुलांच्या कारवाया वाढतील. कामातून समाधान शोधाल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. नातेवाईकांशी संबंध सुधारावेत.
  • सिंह:-
    कौटुंबिक प्रश्नांकडे लक्ष द्यावे. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. उत्तम वाहन सौख्य लाभेल. जमिनीच्या कामात यश येईल. मुलांच्या समस्या सोडवाव्यात.
  • कन्या:-
    प्रवासात सावध राहावे. घरात नातेवाईक गोळा होतील. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. बागकामात वेळ घालवाल. मुलांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी.
  • तूळ:-
    गायन कला जोपासावी. जवळचा प्रवास मजेत होईल. काही नवीन शिकण्याची संधी मिळेल. नातेवाईकांना मदत कराल. अतिअपेक्षा बाळगू नका.
  • वृश्चिक:-
    तुमच्या अहंमन्यतेत वाढ होऊ शकते. कामातील चिकाटी वाढेल. दृढनिश्चय करून पुढे पाऊल टाकावे. व्यावसायिक लाभावर लक्ष लागून राहील. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.
  • धनु:-
    इतरांवर आपला प्रभाव पडण्याचा प्रयत्न करावा. शांत व विचारी भूमिका घ्याल. कामाची दगदग वाढेल. मानसिक स्थिरता जपावी. जोडदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
  • मकर:-
    झोपेची तक्रार दूर करावी. नामस्मरणात वेळ व्यतीत करावा. चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. दिवस मनाप्रमाणे घालवाल.
  • कुंभ:-
    मौल्यवान वस्तू खरेदी कराल. हातात नवीन अधिकार येतील. अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. बढतीसाठी प्रयत्न करावेत.
  • मीन:-
    कामाचे कौतुक केले जाईल. अधिकाऱ्यांची गाठ घ्यावी लागेल. तब्बेतीबाबत हयगय करू नये. फार विचार करत बसू नका. प्रवासात काळजी घ्यावी.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 27 december 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २६ डिसेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, २५ डिसेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ डिसेंबर २०१९
Just Now!
X