News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २७ सप्टेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  शैक्षणिक कामे पार पडतील. आपल्याच मतावर ठाम राहाल. जुगारात यश येवू शकते. तुमच्यातील आनंदीवृत्ती दिसून येईल. खेळकरपणाने सर्वांना जिंकून घ्याल.
 • वृषभ:-
  घरातील वातावरण उल्हासीत असेल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. पैज जिंकता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
 • मिथुन:-
  प्रवासाचा आनंद घ्याल. चांगले साहित्य वाचायला मिळेल. मनाची द्विधावस्था टाळावी. नवीन विषयात रुची दाखवाल. चलाखीने कामे कराल.
 • कर्क:-
  आवडते पदार्थ खायला मिळतील. गृहपयोगी वस्तू खरेदी कराल. व्यापाऱ्यांना चांगला धनलाभ संभवतो. नवीन गोष्टी शिकण्यात लक्ष घालाल. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल.
 • सिंह:-
  दिवस मनासारखा व्यतीत कराल. तुमच्यातील कला लोकांसमोर सादर करता येईल. हितशत्रूंवर विजय मिळवाल. मुलांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.
 • कन्या:-
  काही गोष्टी आपापसात मिटवाव्यात. उगाचच खोडसाळपणा करू नका. कलाकुसरीवर लक्ष द्याल. पोटाच्या तक्रारी जाणवतील. मनात नसतांना प्रवास घडेल.
 • तूळ:-
  तुमची प्राप्ती वाढेल. कामाचा प्रसार करता येईल. हातातील कामात यश येईल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. दूरचा प्रवास टाळावा लागेल.
 • वृश्चिक:-
  केलेल्या कामाचे चीज होईल. मिळकत व खर्च यांची सांगड घालावी लागेल. महिलांना चांगले लाभ संभवतात. कौटुंबिक कलह चर्चेने सोडवावेत. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.
 • धनु:-
  आजारातून हळूहळू बरे वाटू लागेल. बदलीची चन्हे दिसू लागतील. वाताचे विकार त्रास देवू शकतात. शत्रूंवर विजय मिळविता येईल. महिलांना बाहेरील कामे अधिक करावी लागतील.
 • मकर:-
  वारंवार प्रवासाचा योग येईल. काही गोष्टी वेळेत पूर्ण करण्यासाठी धडपडाल. कामातील प्रगतीकडे लक्ष ठेवावे. शारीरिक कष्ट वाढू शकतात. मनातील चुकीचे ग्रह दूर करावेत.
 • कुंभ:-
  गुद्मार्गाचे विकार उद्भवू शकतात. विरोधकांचा समाचार घेतला जाईल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. वेळेवर औषधोपचार करावेत. चढाओढीत भाग घेवू नका.
 • मीन:-
  हातात नवीन अधिकार येतील. काही कामांसाठी पैसा वापरावा लागेल. अधिकाराचा योग्य कामासाठीच वापर करावा. अनावश्यक खर्च टाळावा. धार्मिक यात्रेचा योग येईल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 27 september 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २६ सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, २५ सप्टेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ सप्टेंबर २०१९
Just Now!
X