• मेष:-
    संयम सोडून चालणार नाही. तुमच्या हतबलतेचा इतरांना फायदा होवू शकतो. अतिउत्साह चांगला नाही. शांततेचे धोरण ठेवावे लागेल. प्रेमसंबंधात सावधानता बाळगावी.
  • वृषभ:-
    कौटुंबिक गोष्टीत अधिक लक्ष घालावे. चांगले वाहन सौख्य लाभेल. जमिनीची कामे पार पडतील. गृहसौख्याकडे लक्ष द्यावे. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.
  • मिथुन:-
    कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. अधिकाराचा वापर कराल. अधिक जबाबदारीने वागाल. प्रवासात काळजी घ्यावी. मैत्रीतील कटुता टाळावी.
  • कर्क:-
    सारासार विचार करुन बोलावे. वायफळ खर्च टाळावा. चोरांपासून सावध राहावे. रागावर नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडाल.
  • सिंह:-
    महत्त्वकांक्षा वाढेल. काही कामात अडचण येवू शकते. भावनेच्या आहारी जावू नका. अधिकारवाणीने आपले स्थान प्रस्थापित कराल. संयम सोडू नका.
  • कन्या:-
    एककल्ली विचार करु नका. वायफळ बडबड करु नये. सार्वजनिक गोष्टींचे भान राखावे. सामाजिक जाणीवेपोटी काही कामे हातात घ्यावी लागतील. उघडपणे बोलू नका.
  • तुळ:-
    हाती आलेल्या संधीचे सोने करावे. ओळखीने कामे होतील. भडक मत मांडू नका. अधिकाराचा सुयोग्य वापर करावा. मनातील इच्छा पूर्ण होईल.
  • वृश्चिक:-
    कलेला चांगला वाव मिळेल. मानसिक सौख्य लाभेल. वडीलधाऱ्यांचे मत घ्यावे. कामाचे स्वरुप लक्षात घेऊन नियोजन करावे. सन्मानास पात्र व्हाल.
  • धनु:-
    जोडीदाराविषयी होणारे गैरसमज दूर करावेत. अति घाई उपयोगाची नाही. जबाबदारीची जाणीव ठेवाल. वरीष्ठांच्या आदेशाचे पालन करावे. काही गोष्टींना पुरेसा वेळ द्यावा.
  • मकर:-
    जुन्या गोष्टीत अडकून राहू नका. परिस्थितीला नावे ठेवू नयेत. तुमच्यातील उदारपणा दाखवावा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. चटकन मत बनवू नका.
  • कुंभ:-
    उताविळपणा करु नका. चर्चेवर अधिक भर द्यावा. सामोपचाराने गोष्टींकडे पहावे. एकमेकांतील प्रेमभावनेची जपणूक करावी. हट्टीपणा दूर सारावा.
  • मीन:-
    कामातील बदल अनुकूल ठरेल. नोकरांची उत्तम साथ लाभेल. चुगलीखोर लोकांकडे दुर्लक्ष करावे. नातेवाईकांचे प्रश्न समोर येतील. हातातील कामास यश येईल.

     – ज्योतिषी विद्याधर करंदीकर