मेष

संमिश्र लाभाचा दिवस. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार विचारवंत साहित्यिकांना उत्तम दिवस. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. ओम हरये नमः जप करावा.
आजचा रंग – आकाशी

वृषभ

संमिश्र लाभाचा दिवस त्यामुळे वादविवाद टाळावेत. आजचे ग्रहमान सर्वकामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. ओम शांभवे नमः हा जप करावा.
आजचा रंग – निळा

मिथुन

संमिश्र लाभाचा दिवस. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांशी मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत. ओम आदित्याय नमः जप करावा.
आजचा रंग – करडा

कर्क

संमिश्र लाभाचा दिवस. आनंदी दिवस जाईल. सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम आहे. ओम श्री विश्वेश्वराय नमः जप करणे.
आजचा रंग – नारंगी

सिंह

संमिश्र लाभाचा दिवस. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत.
आजचा रंग – हिरवा

कन्या

संमिश्र लाभाचा दिवस. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडित नोकरी व्यवसायामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळ नंतरचा वेळ आनंदात जाईल. श्री गोरक्षनाथाय नमः जप करावा.
आजचा रंग – हिरवा

तुळ

संमिश्र लाभाचा दिवस. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको. ओम श्री लक्ष्म्यै नमः जप करावा.
आजचा रंग – जांभळा

वृश्चिक

संमिश्र लाभाचा दिवस. कौटुंबिक सौख्य जाणवेल. नवविवाहितांसाठी चांगला दिवस आहे. व्यवसायाशी निगडित एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रामरक्षेचे पाठ करावेत.
आजचा रंग – गुलाबी

धनु

संमिश्र लाभाचा दिवस. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंचना राहतील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. पशुपक्षांना अन्नदान करावे.
आजचा रंग – लाल

मकर

मुलांशी निगडित किंवा घरातील धाकट्या भावंडाशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणींमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. ओम त्रिनेत्राय नमः जप करावा.

कुंभ

भविष्यातील मोठ्या योजनांची आज सुरुवात होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदीवार्ता समजू शकेल. ओम नमः शिवाय जप करणे.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

मीन

संमिश्र लाभाचा दिवस. भावंडाशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील. ओम शिवाय नमः जप करणे.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu