मेष ः कणकधारा स्तोत्र म्हणावे. आजचा शुभ रंग नारंगी आहे. मोठी आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कुठल्याही स्वरुपाचे वादविवाद टाळावेत. कौटुंबीक सौख्य लाभेल. बांधकाम व्यवसायीक, जमिनीचे खरेदी-विक्री करणारे व्यवसायीक यांनी विशेष दक्षता बाळगावी. कायदेशीर प्रश्न सोडवू शकाल. वृषभ ः श्री आदिगुरूवे नमः या मंत्राचा जप कराव. आजचा शुभ रंग हिरवा आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल. मिथुन ः गुरुचरित्राचे पारायण करावे. आजचा शुभ रंग पिवळा आहे. मोठे व्यवसायिक धाडस करु शकाल. सर्व क्षेत्रातील अधिकारी वर्गांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. महत्त्वाकांक्षी योजना राबवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहिल. व्यवसायिकांचे नियोजन उत्तम राहिल. कर्कः गणेश अष्ट्काचे पठण करावे. आजचा शुभ रंग पांढरा आहे. परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणार्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. व्यवसायिकांना लाभदायक ग्रहमान आहेत. प्रतिष्ठेचे योग संभवतात. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडी-अडचणी सोडवू शकाल. सिंह ः श्री गुरुनाथाय नमः या मंत्राचा जप करावा आजचा शुभ रंग गुलाबी आहे. व्यवसायीक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचार विनिमय करावा. प्रवास जपून करावेत. सर्वांशी सलोखा राखावा. मोठी आर्थिक उलाढाल करु नये. कन्या ः गुरु मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग लाल आहे. व्यवसायिकांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. दुरच्या प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबीक स्थिरतेच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. शेती, कमोडिटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. गुंतवणुकीस अनुकूल ग्रहमान आहे. तुळ ः गुरु मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेचे आणि वाताशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत. मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. वृश्चिक ः दिवसभर गुरु स्मरण करावे. आजचा शुभ रंग आकाशी आहे. महत्त्वाचे व्यवसायिक निर्णय घेऊ शकाल. नवीन योजना राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल. कुटुंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत. धनु ः गुरु मंत्राचा जप करावा आजचा शुभ रंग तपकिरी आहे. कुटुंबाशी निगडित अडी-अडचणी सोडवू शकाल. घरातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीची काळजी सतावेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यवसायीक, फर्निचर, गृहोपयोगी वस्तू आणि लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्यांसाठी उत्तम ग्रहमान. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. मकर ः दत्त महाराजांच्या मंदिरात अन्नदान करावे. आजचा शुभ रंग नारंगी आहे. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. सर्व क्षेत्रामध्ये स्पर्धा जाणवेल परंतू स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल. नोकरदारांना, गृहिणींना अतिरीक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे. आर्थिक नियोजन उत्तम राहिल. कुंभः पुरुषसुक्ताचे पठण करावे. आजचा शुभ रंग राखाडी आहे. नवीन योजना राबवू शकाल. व्यवसायीक हितसंबंध दृढ करु शकाल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायिकांना उत्तम आर्थिक स्थितीचा दिवस आहे. मीन ः श्री गुरूवे नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पिवळा आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक आवक उत्तम राहिल. व्यवसायिक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल. — डॉ. योगेश मुळे Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu