News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, ०१ एप्रिल २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

ॐ भगवते नमः. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. नवीन योजनांचा पाठपुरावा करु शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाचे योग संभवतात. जुने मित्र मंडळी भेटतील.
आजचा रंग –लाल

वृषभ

ॐ अवदुताय नमः. अधिकार प्राप्त होतील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. महत्त्वाच्या कामामध्ये तुमचा सहभाग असेल. अधिकार वर्गांनी सावधपणे निर्णय घ्यावेत. वाहन सौख्य लाभेल.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

ॐ स्वानंदाय नमः. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये नवीन दिशा मिळेल. जुन्या योजना राबविण्याच्या दृष्टीने ग्रहमान योग्य आहेत. जमिनीशी, पाण्याशी, रसायनांशी निगडीत व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. परदेशाशी निगडीत व्यावसायिकांना उत्तम ग्रहमान आहे.
आजचा रंग –आकाशी

कर्क

ॐ नारायणाय नमः. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवावा. वाहने जपून चालवावी.
आजचा रंग –लाल

सिंह

ॐ श्रीनिवासाय नमः. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन उत्तम राहील. नोकरदार मंडळींना प्रवासाचे योग संभवतात, प्रगतीकारक ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल. कौटुंबीक कलह कमी होतील. सर्व क्षेत्रामध्ये स्थिरता प्राप्त होईल.
आजचा रंग -गुलाबी

कन्या

ॐ सुदर्शनाय नमः. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणुक करावी. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेचे, पचनाचे विकार असलेल्यांनी विशेष दक्षता बाळगावी. वाहने जपून चालवावी.
आजचा रंग –राखाडी

तुळ

ॐ मुकुंदाय नमः. मोठ्या निर्णयांचा पाठपुरावा करता येईल. महत्त्वकांक्षी योजना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूलता प्राप्त होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जुने मित्र भेटतील.
आजचा रंग -राखाडी

वृश्चिक

ॐ मंगेशाय नमः. कौटुंबीक सौख्याचा दिवस आहे. आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ जाईल. कुटुंबासमवेत प्रवासाचे योग आहेत. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहेत. बांधकाम, शेती, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांना आजचे ग्रहमान अनुकूल आहेत.
आजचा रंग –हिरवा

धनु

ॐ प्रणवाय नमः. व्यावसायिक स्पर्धेला सामोरे जावे लागेल. नोकरदार मंडळींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळून वागावे. विद्यार्थी, गृहिणींना नवीन संधी उपलब्ध होतील. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ घालवाल. छोट्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग –पांढरा

मकर

ॐ चिन्मयाय नमः. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसुल करता येतील. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणुक करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल.
आजचा रंग –हिरवा

कुंभ

ॐ क्रयमूर्तये नमः. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. व्यवसाय, नोकरीमध्ये सुसंधी उपलब्ध होतील. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. शेती, लोखंड, रसायनांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहे.
आजचा रंग- नारंगी

मीन

ॐ मंगलमूर्तये नमः. मोठे आर्थिक नियोजन सावधानपणे करावेत. सर्वांशी सलोखा ठेवावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. नोकरदार मंडळींना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागेल, त्यामुळे चित्त स्थिर ठेवावे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 1:28 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 01 april 2019
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, ३१ मार्च २०१९
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, ३० मार्च २०१९
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २९ मार्च २०१९
Just Now!
X