27 January 2021

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, ०२ एप्रिल २०१८

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

ॐ भगवते नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. व्यावसायिक स्थिरता लाभेल. नोकरदारामंडळींना दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कुटूंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. शेती, कमोडिटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –लाल

वृषभ

ॐ अवदुताय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधानता बाळगावी. मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.
आजचा रंग –पांढरा

मिथुन

ॐ स्वानंदाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. संतती सौख्य लाभेल. कुटूंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत. मोठे निर्णय घेऊ शकाल.
आजचा रंग –आकाशी

कर्क

ॐ नारायणाय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. बांधकाम व्यावसायिक, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. प्रवासाचे योग संभवतात. कुटूंबासमवेत वेळ घालवू शकाल.
आजचा रंग –लाल

सिंह

ॐ श्रीनिवासाय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. कामाचा ताण जाणवेल. नोकरदारांना, गृहिणींना अतिरिक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे. आर्थिक नियोजन उत्तम राहील. स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल.
आजचा रंग -गुलाबी

कन्या

ॐ सुदर्शनाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल करू शकाल. नोकरीमध्ये बढतीचे, पगारवाढीचे योग आहेत. व्यावसायिकांना उत्तम आर्थिक आवाक्याचे दिवस आहेत.
आजचा रंग –राखाडी

तुळ

ॐ मुकुंदाय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल. महत्त्वकांक्षी योजनांची आखणी करावी.
आजचा रंग -राखाडी

वृश्चिक

ॐ मंगेशाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत. वादविवाद टाळावेत. नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. कौटुंबिक सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, जमिनीचे खरेदीविक्री करणारे व्यावसायिक यांनी विशेष दक्षता बाळगावी.
आजचा रंग – हिरवा

धनु

ॐ प्रणवाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –पांढरा

मकर

ॐ चिन्मयाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. मोठे व्यावसायिक धाडस करू शकाल.
आजचा रंग –हिरवा

कुंभ

ॐ क्रयमुर्तये नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. लाभदायक ग्रहमान आहेत. व्यावसायिकांना, नोकरदारमंडळींना आणि गृहिणींना प्रतिष्ठेचे योग आहेत. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत.
आजचा रंग-नारंगी

मीन

ॐ मंगलमुर्तये नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. व्यावसायिक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचारविनिमय करावा. प्रवास जपून करावेत. वरिष्ठांची मर्जी राखावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये.
आजचा रंग –तपकिरी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2018 1:08 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 02 april 2018
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, ०१ एप्रिल २०१८
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, ३१ मार्च २०१८
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ३० मार्च २०१८
Just Now!
X