• मेष:-
    प्रेमसंबंध अधिक दृढ करावेत. मुलांची स्वतंत्रवृत्ती जाणून घ्यावी. उगाचच चिडचिड करू नये. मनाचा ठामपणा ठेवावा लागेल. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेवू नयेत.
  • वृषभ:-
    चौकसपणे विचार कराल. जुगारातून फायदा संभवतो. स्वच्छंदीपणाने वागाल. घरात नातेवाईकांचा गोतावळा जमा होईल. स्वच्छतेवर अधिक लक्ष द्याल.
  • मिथुन:-
    घरातील वातावरण आनंदी राहील. जोडीदाराकडून धनप्राप्ती होईल. लहान प्रवास होतील. कामे तडीस नेली जातील. काही कामे धावपळीत करावी लागतील.
  • कर्क:-
    काही कौटुंबिक अडचणी दूर कराल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. अंगीभूत कलागुणांचा उपयोग होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. गुंतवणुकीला वाव आहे.
  • सिंह:-
    जुन्या अनुभवातून शिकायला मिळेल. आपले उद्दिष्ट लक्षात ठेवावे. तुमच्याकडे लोक आदराने पाहतील. धावपळ वाढू शकते. वेळेचे भान राखावे लागेल.
  • कन्या:-
    सरकारी कामानिमित्त प्रवास करावा लागेल. मनाची चंचलता जाणवेल. एकावेळी फार कामे हाती घेवू नका. कुटुंबासह प्रवास कराल. खर्च वाढू शकतो.
  • तूळ:-
    मोठ्या लोकात उठबस होईल. केलेल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होईल. मित्रांची चांगली साथ लाभेल. चांगली आर्थिक प्राप्ती होईल.
  • वृश्चिक:-
    केलेल्या नियोजनावर अधिक भर द्यावा. हातात नवीन अधिकार येतील. शत्रूंचा बंदोबस्त केला जाईल. आनंददायक घटना घडतील. विद्यार्थ्यांचे कौतुक केले जाईल.
  • धनु:-
    धार्मिक कामासाठी प्रवास कराल. नवीन ठिकाणी धावपळ करावी लागेल. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. पाठदुखी सारखे त्रास जाणवतील. मुलांना अनुभवातून शिकायला मिळेल.
  • मकर:-
    कामात एकाच ठिकाणी गुंतून पडाल. जोडीदाराशी मतभेद टाळावेत. काही कामात नकारघंटा वाजेल. चिकाटी सोडून चालणार नाही. आर्थिक लाभ संभवतात.
  • कुंभ:-
    करता येण्याजोगी बरीच कामे सामोरी येतील. भागीदारीत विशेष लक्ष घालावे. बाहेरील कामात अधिक गुंतून पडाल. प्रवासात अधिक काळजी घ्यावी. योजनांवर लक्ष केंद्रित करावे.
  • मीन:-
    कामातील अडचणी दूर होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल. मोहात अडकू नका. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर