05 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, ०४ नोव्हेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  घरासाठी काही खरेदी कराल. दिवसभर कामाची दगदग राहील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुगारातून आर्थिक लाभ संभवतो. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळाल.
 • वृषभ:-
  मुलांचा लहरीपणा जाणवेल. आरोग्यात सुधारणा होईल. जोडीदाराशी गप्पा-गोष्टी कराल. रागावर नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक खर्च वाढेल.
 • मिथुन:-
  कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. आपली पत-प्रतिष्ठा सांभाळावी. मित्रांचा गैरसमज दूर करावा. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत.
 • कर्क:-
  उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. हातातील अधिकाराचा वापर करावा. कामाचे समाधान लाभेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. करमणुकीत दिवस व्यतीत कराल.
 • सिंह:-
  चोरांपासून सावध राहावे. कोणाचाही मत्सर करू नये. भावंडांशी मतभेद संभवतात. परिस्थितीला नावे ठेवू नका. आत्मविश्वास बाळगावा.
 • कन्या:-
  क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नयेत. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. वादविवादात अडकू नका. कामातील जोम वाढेल. तुमचे श्रम वाढू शकतात.
 • तूळ:-
  श्रमामुळे थकवा जाणवू शकतो. काही कामे संथ गतीने होतील. अडथळ्यातून मार्ग काढाल. ध्यानधारणा करावी. कमिशनमधून फायदा संभवतो.
 • वृश्चिक:-
  हजरजबाबीपणे उत्तरे द्याल. चलाखीने कामे कराल. सर्वांशी गोडीने वागाल. तुमचा तर्क अचूक ठरेल. अंगीभूत कलेला प्रसिद्धी मिळेल.
 • धनु:-
  प्रौढपणे विचार मांडाल. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. मानसिक व्यग्रता जाणवेल.
 • मकर:-
  दिवस आनंदात जाईल. कामात स्त्री वर्गाची मदत घ्याल. लहानात लहान होऊन खेळाल. सरकारी कामे वेळ खातील. वरिष्ठांना नाराज करू नका.
 • कुंभ:-
  बोलण्याने सगळ्यांना जिंकून घ्याल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. काही कामे कमी श्रमात पार पडतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. वाद-विवादात पडू नये.
 • मीन:-
  चित्त एकाग्र करावे. सुप्त इच्छा पूर्ण होईल. व्यवसायातून चांगला लाभ होईल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 04 november 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, ०३ नोव्हेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, ०२ नोव्हेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १ नोव्हेंबर २०१९
Just Now!
X