• मेष:-
    कामात स्थैर जपण्याचा प्रयत्न करावा. कौतुकास पात्र व्हाल. व्यापाऱ्यांना चांगला फायदा संभवतो. मनाची चंचलता वाढू देऊ नका. घराची साफसफाई काढाल.
  • वृषभ:-
    शैक्षणिक कामे होतील. धार्मिक स्थळांना भेट द्याल. सेवेचे महत्व समजावून सांगाल. घरात मंगलकार्ये होतील. स्वप्नात रमून जाल.
  • मिथुन:-
    अचानक धनलाभाची शक्यता. जुनी कामे सामोरी येतील. नसत्या चिंता करू नका. एकावेळी अनेक कामे काढू नका. घरगुती कामात गढून जाल.
  • कर्क:-
    जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. भागीदारीतून चांगला फायदा होईल. तुमचा जनसंपर्क वाढेल. जवळचे नातेवाईक भेटतील. करमणुकीचे कार्यक्रम बघाल.
  • सिंह:-
    परिस्थितीला नावे ठेवू नका. क्षुल्लक गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. आत्मविश्वास बाळगावा. चटकन निराश होऊ नये. कफविकार जाणवतील.
  • कन्या:-
    चौकसपणे विचार करावेत. सदैव जागरूकता दाखवाल. मुलांच्यात खेळण्यात रमून जाल. जुगारातून फायदा होईल. कामामुळे थकवा जाणवेल.
  • तूळ:-
    घरातील वातावरण आनंदी राहील. गृहिणी सर्वांचे मनापासून करतील. कामातील आधुनिकता जाणून घ्याल. उत्तम गृहसौख्य लाभेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल.
  • वृश्चिक:-
    भावंडांची मदत मिळेल. विविध विषयात रुची दाखवाल. जवळचा प्रवास मजेत होईल. मानसिक चाचंल्य जाणवेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.
  • धनु:-
    गृहउपयोगी वस्तू खरेदी कराल. दिवस धावपळीत जाईल. आवडीचे पदार्थ चाखाल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. चिकाटीने कामे कराल.
  • मकर:-
    तुमच्या शब्दाला मान मिळेल. सर्वांवर तुमची उत्तम छाप पडेल. दिवसभर प्रसन्न वाटेल. कमिशनचा फायदा उठवावा. कलेत मन रमवाल.
  • कुंभ:-
    फार विचार करत बसू नका. थोडे अधिक कष्ट पडू शकतात. ध्यानधारणा करावी. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. मानसिक शांतता जपावी.
  • मीन:-
    स्त्री समुहात वावराल. चांगला व्यावसायिक फायदा संभवतो. कामात स्त्रीवर्गाची मदत होईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. सुखासक्तपणे वागाल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर