19 September 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, ०७ सप्टेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष:-
    आततायीपणा करून चालणार नाही. दिवस स्वत:च्या मर्जीप्रमाणे घालवाल. घरात टापटीपपणा ठेवाल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आपला साहसीपणा ताब्यात ठेवावा.
  2. वृषभ:-
    कष्टाचा मोबदला मिळेल. सामाजिक गोष्टींचे भान राखावे. अनुकूलतेचा सदुपयोग करावा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. तुमच्याबाबतचे गैरसमज दूर होतील.
  3. मिथुन:-
    अंगीभूत कलेला वेळ द्यावा. स्व-कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. आळस झटकून टाका. आर्थिक मिळकतीत वाढ होईल. हातातील कामे पूर्णत्वास जातील.
    कर्क:-
    प्रलंबित कामे मार्गी लागतील. अतिगोड पदार्थ खाणे टाळा. धनसंचय वृद्धिंगत होईल. मित्रांची भेट मन प्रसन्न करून देईल. दिवसाचा पूर्वार्ध मजेत जाईल.
  4. सिंह:-
    जुनी देणी चुकवून टाका. शक्यतो वरिष्ठांना नाराज करू नका. व्यक्तिमत्वातून व बोलण्यातून चांगली छाप पाडा. नोकरदार वर्गाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता. समोरच्याला आपण होऊन मदत कराल.
  5. कन्या:-
    बोलण्यातून कर्तृत्व सिद्ध कराल. मानसिक शांततेला अधिक महत्व द्याल. संशोधन वृत्ती डोके वर काढेल. आहारावर नियंत्रण ठेवा. झोपेची तक्रार जाणवेल.
  6. तूळ:-
    घरात शांत राहून सहकार्य करा. स्वप्नामध्ये अडकून पडू नका. पत्नीशी मतभेदाची शक्यता. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. ज्येष्ठांचे उत्तम मार्गदर्शन लाभेल.
  7. वृश्चिक:-
    कोणावरही अवलंबून राहू नका. दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी सर्वार्थाने अनुकूलता लाभेल. विशाल दृष्टिकोन बाळगावा. जुन्या मित्रांची गाठ पडेल.
  8. धनू:-
    विद्यार्थ्यांना अनपेक्षित यश मिळेल. जुने संशय मनातून काढून टाका. नातेवाईकांशी सलोखा साधावा. जुगार खेळताना सावधानता बाळगा. कमिशन मधून लाभ होईल.
  9. मकर:-
    स्पर्धात्मक गोष्टींची आवड निर्माण होईल. जोडीदाराची प्रेमळ सौख्य लाभेल. विरोधकांवर मात करता येईल. घरगुती ताण-तणाव दूर करता येतील. चहाडखोर व्यक्तीकडे दुर्लक्ष करावे.
  10. कुंभ:-
    कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. कामात संभ्रम होऊ देऊ नका. बाहेरील कामे पुढे ढकलावीत. आहारावर नियंत्रण ठेवावे. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.
  11. मीन:-
    बोलताना चुकीचा शब्द बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्या. व्यायामाची आवड पूर्ण कराल. बर्‍याच दिवसांनंतर मित्रांची गाठ पडेल. कौटुंबिक वातावरण खेळते राहील. मित्रांच्या भेटी मन प्रसन्न करतील.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2020 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 07 september 2020 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, ०६ सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, ०५ सप्टेंबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२०
Just Now!
X