- मेष:-
बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. इतरांना मदत कराल. तुमचा मान वाढेल. - वृषभ:-
नसत्या चिंता करू नका. मानसिक स्थैर्य जपावे. घरातील वातावरण प्रसन्न असेल. मित्रमंडळींमध्ये गप्पा मारण्यात रमून जाल. घराची कामे पूर्ण करण्यावर लक्ष द्यावे. - मिथुन:-
जोडीदाराच्या वैचारीकतेचे कौतुक कराल. मनात नसतांना प्रवास करावा लागेल. मुलांच्या तक्रारींकडे लक्ष ठेवावे. शांततेचे धोरण ठेवावे. वैचारिक बदल करून पाहावा. - कर्क:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेवू नका. नातेवाईकांशी सलोख्याने वागावे. डोळ्यांची काळजी घ्यावी. - सिंह:-
हिमतीवर कामे हाती घ्याल. ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न कराल. कामातील उताविळपणा टाळावा. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. अधिकार गाजवाल. - कन्या:-
गैरसमजुतीत अडकू नका. उष्णतेचे विकार जाणवू शकतात. सामुदाईक गोष्टीत फार लक्ष घालू नये. प्रवासात काळजी घ्यावी. डोळ्यांची काळजी घ्यावी. - तूळ:-
काही कामे अधिक श्रमाने पूर्ण करावी लागतील. सतत खटपट करत राहाल. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. स्त्री समुहात वावराल. मुलांच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे. - वृश्चिक:-
वरिष्ठांपुढे नमते घ्यावे लागेल. वरचा दर्जा मिळविण्याचा प्रयत्न कराल. महत्वाकांक्षेपुढे इतर गोष्टी दुय्यम मानाल. साहस करतांना सारासार विचार करावा. कामात इच्छित बदल कराल. - धनु:-
स्वकष्टावर अधिक भर द्यावा. दुचाकी वाहन चालवितांना काळजी घ्यावी. उपासनेला अधिक बळ लाभेल. मैदानी खेळ खेळाल. सखोल ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा. - मकर:-
अनाठायी खर्च आवरता घ्यावा. वादविवादात न अडकलेलेच बरे. कामाच्या ठिकाणी आपले पत सांभाळावे. आरोग्याची काळजी घ्यावी. कोर्ट-कचेरीची कामे निघतील. - कुंभ:-
व्यावसायिक लाभाचा दिवस. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. नातेवाईकांची मदत घेता येईल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. नोकर-चाकरांचे सुख लाभेल. - मीन:-
शैक्षणिक कामाला गती येईल. कामात प्रगतीला वाव आहे. तुमच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक होईल. चिकाटीने कामे करण्यावर भर द्याल. एखाद्या गोष्टीसाठी अडून राहू नये.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 9, 2019 2:01 am
Web Title: daily horoscope astrology in marathi monday 09 september 2019 aau 85