मेष

महादेवाच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी. चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. भावंडांशी, आप्तेष्ठांशी वाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. पगारवाढ किंवा बदलीसाठी प्रयत्न करावेत. व्यवसायामध्ये कामगिरी उत्तम राहिल.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू ठेवणे. चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. आर्थिक स्थिती चांगली राहिल. व्यवसाय नोकरीमध्ये आर्थिक नियोजन करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन गाठीभेटी होतील. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना योग्य दिवस आहे. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – राखाडी

मिथुन

महादेवाच्या मंदिरात धान्य आणि पांढरी फुले अर्पण करावी. चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वाच्या कामांचे निर्णय घ्यावेत. महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यासाठी उत्तम ग्रहमान. चांगल्या प्रवासाचे योग येतील. व्यावसायिकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग – नारंगी

कर्क

ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. आर्थिक उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्ता, शेअरशी निगडीत मंडळीनी काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक करताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी.
आजचा रंग – लाल

सिंह

ओम नमः शिवाय जप करावा. चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. सर्व लाभांसाठी उपयुक्त दिवस. महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करावी. महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी सावधनता बाळगावी. प्रवासाचे योग.
आजचा रंग – लाल

कन्या

महादेवाच्या मंदिरात अभिषेक करणे. चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. अधिकारी वर्गासाठी लाभदायक संधी उपलब्ध होतील. ज्येष्ठांशी निगडीत सुवार्ता समजतील. कर्जप्रकरणाचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसूल होण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाचा ताण वाढेल.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

ओम नमः शिवाय जप दिवसभर मनातल्या मनात सुरू ठेवावा. चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. सुसंधी प्राप्त होतील. नोकरी व्यवसायांमध्ये उत्तम सहकार्य लाभेल. परदेशाशी निगडीत व्यापार, नोकरीमध्ये चांगल्या संधी निर्माण होतील. कामाचा ताण वाढेल. प्रवासाचे योग
आजचा रंग – क्रीम

वृश्चिक

ओम सोमाय नमः जप करून दिवसाची सुरुवात करावी. चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. प्रवास जपून करावेत. आर्थिक निर्णय घेताना सल्लामसलत करावी. सहकाऱ्यांशी, कामगारांशी वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्तेचे व्यवहार सावधपणे करावेत. वातविकार आणि उष्णतेचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.
आजचा रंग – निळा

धनु

ओम नमः शिवाय जप दिवसभर मनातल्या मनात सुरू ठेवावा. चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – पांढरा

मकर

कुलदैवतेचे स्मरण करून दर्शन घ्यावे. चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. वादविवाद टाळावेत. कामगारांशी जुळवून घ्यावेत. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – नारंगी

कुंभ

ओम नमः शिवाय मंत्राचा जप करणे. चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान. नोकरदारांना मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहिल. दूरच्या प्रवासाचे योग येतील.
आजचा रंग – नारंगी

मीन

संध्याकाळी महादेवाचे दर्शन घ्यावे. पशूपक्ष्यांना अन्नदान करावे. चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत सहलीचे किंवा प्रवासाचे योग. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu