मेष:-अति घाईत निर्णय घेऊ नका. मनावर ताबा ठेवा. जटिल समस्येवर तोडगा निघू शकेल. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल.

वृषभ:-हातातील काम पूर्ण होईल. आज अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. जवळचा प्रवास सुखाचा होईल. प्रेमातील व्यक्तीसाठी नातेसंबंध दृढ करणारा दिवस.

21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
7th April Panchang Masik Shivratri Mesh To Meen Daily Horoscope
७ एप्रिल पंचांग: एप्रिलची शिवरात्री मेष ते मीन राशींपैकी कुणाला देईल भोलेनाथांची कृपा; तुमच्या कुंडलीत काय लिहिलंय?
4th April Panchang Rashi Bhavishya Guruvaar
४ एप्रिल राशी भविष्य: गुरुवारी श्रवण नक्षत्रात मेष ते मीन पैकी कुणाचे नशीब चमकणार? धन, आरोग्य कसे असेल?

मिथुन:-दिवसभर कामाची लगबग राहील. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. दुसर्‍यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सहकार्‍यांना कमी लेखू नका. टीमवर्कचे महत्त्व लक्षात घ्यावे.

कर्क:-धावपळीचा दिवस राहील. आपल्याच नादात दिवस घालवाल. स्वत:च्याच मताला चिकटून राहाल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मित्राची गाठ पडेल.

सिंह:-सरकारी कामे पुढे सरकतील. प्रकृतीस जपावे. वादविवादात आपली सरशी होईल. व्यावसायिक क्षेत्रात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. फार काळजी करू नये.

कन्या:-स्वत:वर कायम विश्वास ठेवावा. विजय तुमचाच होईल. आपली जबाबदारी ओळखून काम कराल. तुमची प्रतिमा उंचावेल. अधिकची कामे अंगावर पडतील.

तूळ:-निर्णयाचा पुनर्विचार करावा. जुनी देणी फेडाल. घरात शांतता ठेवावी. अनावश्यक खर्चाला कात्री लावावी. दिनचर्येत थोडासा बदल करून पाहावा.

वृश्चिक:-नोकरी व्यवसायात नवीन काम मिळेल. उत्साहात दिवस जाईल. दिवसाची सुरुवात संपर्क साधण्यात जाईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. खोट्या गोष्टींचा आधार घ्याल.

धनू:-दिवस कामात व्यस्त राहील. खर्चिक कामे निघतील. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नवीन ओळख वाढवताना सावध रहा. कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील.

मकर:-नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. हलगर्जीपणा करून चालणार नाही. दिवस उत्साही असेल. आनंदी मनाने कार्यरत राहाल. प्रलोभनाला भुलू नका.

कुंभ:-रखडलेली कामे हळूहळू पुढे सरकतील. व्यायामात खंड पडू देऊ नका. मुलांची चिंता सतावेल. जि‍भेवर ताबा ठेवावा. आव्हानांचा सामना करावा.

मीन:-नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. आततायीपणे कामे करू नका. आत्ममग्न राहाल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर