25 September 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, १४ ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  कामानिमित्त घरापासून दूर रहावे लागेल. मानसिक स्वास्थाचा विचार करावा. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. गप्पांमधून मैत्री वाढेल.
 • वृषभ:-
  अपेक्षांना मूर्त स्वरूप द्याल. घेतलेल्या कामाचे चीज होईल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. घरगुती कार्यक्रम व्यवस्थित पार पडतील.
 • मिथुन:-
  कामाचा वेग वाढेल. व्यावसायिक स्तरावर कौतुक केले जाईल. व्यापाऱ्यांना अपेक्षित धनलाभ होईल. कामाचे योग्य स्वरूप लक्षात घ्यावे. वडिलांची मदत मिळेल.
 • कर्क:-
  सामाजिक सेवेत सहभाग घ्याल. नि:स्वार्थीपणे इतरांना मदत कराल. अन्यायाविरुद्ध चीड दर्शवाल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. मनाचा मोठेपणा दाखवाल.
 • सिंह:-
  आरोग्याची काळजी घ्यावी. काही कामांसाठी अधिक श्रम करावे लागतील. विचारांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करावा. चिडचिड करू नका. संयम बाळगावा लागेल.
 • कन्या:-
  आर्थिक गरज भागली जाईल. तुमची महत्वाची चिंता मिटेल. स्वकष्टाचा आनंद मिळवाल. कामे विनासायास पार पडतील. अधिकारी व्यक्ती भेटतील.
 • तूळ:-
  विश्वासू लोकांची मदत होईल. हाताखालील कामगारांची उत्तम साथ मिळेल. कामातून चांगले समाधान लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील.
 • वृश्चिक:-
  दुसऱ्याला शिक्षणासाठी मदत कराल. धार्मिक गोष्टींची आवड जोपासाल. तुमच्या कामाचे प्रशस्ती पत्रक मिळेल. पुढील कामाचे योग्य नियोजन कराल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्यावा.
 • धनु:-
  घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मन:शांतीसाठी प्रयत्न करावेत. कौटुंबिक खर्चाचा विचार करावा. तडकाफडकी कोणतीही गोष्ट करू नका. सारासार विचारावर भर द्या.
 • मकर:-
  तुमच्या प्रतिस्पर्धींवर लक्ष ठेवावे लागेल. लहान प्रवास सुखाचा होईल. भावंडांची मदत घेता येईल. मनाची चंचलता जाणवेल. पत्नीची योग्य साथ मिळेल.
 • कुंभ:-
  कौटुंबिक सौख्याकडे लक्ष ठेवावे. फसवणुकीपासून सावध राहावे. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. चोरांपासून सावध राहावे. गोष्टी फार ताणू नयेत.
 • मीन:-
  दिवस आनंदात घालवाल. मुलांचे कौतुक कराल. रेस, जुगार यातून फायदा संभवतो. मुलांचे प्रेमळ हट्ट पुरवाल. आरोग्यात सुधारणा होईल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 14 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, १३ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, १२ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ११ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X