19 September 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, १४ सप्टेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-जुन्या कामांमधून यश मिळेल. घरात धार्मिक कार्य घडेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. दिवसाच्या पूर्वार्धात रखडलेली कामे मार्गी लागतील. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील.

वृषभ:-सामाजिक मुद्यात लक्ष घालू नका. अपेक्षित उत्तर मिळेल. नवीन ओळखीतून लाभ होईल. अप्रिय व्यक्तीची भेट घडू शकते. शासनाकडून लाभाची शक्यता.

मिथुन:-घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. मन काहीसे विचलीत राहील. मुलांची प्रगती पाहून मन खुश होईल.

कर्क:-मानसिक चंचलता राहील. अति विचार करू नका. महत्त्वाची कामे आज टाळावीत. कौटुंबिक जबाबदारी सांभाळावी लागेल. जवळचे मित्र भेटतील.

सिंह:-प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. अति कामामुळे थकवा जाणवेल. बोलण्यातील माधुर्यामुळे मान मिळवाल. व्यापारीवर्ग खुश राहील. कामाची धावपळ वाढेल.

कन्या:-रखडलेली कामे पूर्ण करा. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. मन प्रसन्न राहील. चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च होतील. व्यापारी क्षेत्रातील प्रयत्न फळाला येतील.

तूळ:-योग्य शहानिशा करावी. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. आनंदाची अनुभूति घ्याल. धनलाभाचे उत्तम योग आहेत. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस.

वृश्चिक:-नवीन खरेदी कराल. विद्यार्थ्यांनी अति घाई करू नये. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. गुंतवणुकी संदर्भात नवीन गोष्टी जाणून घ्याल. अति विचारात वेळ वाया घालवू नका.

धनू:-मानसिक शांतता लाभेल. कामात तुमचा उत्तम प्रभाव पडेल. सासरच्या मंडळीकडून धनलाभाचे योग आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. जुने काम मार्गी लावण्याची संधी मिळेल.

मकर:-धार्मिक कामाची आवड वाढेल. जोडीदाराच्या कलाने काम करा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मिळकतीच्या बाबतीतील प्रयत्न यशस्वी होताना दिसतील. भावनात्मकता टाळावी.

कुंभ:-जोडीदाराचे म्हणणे टाळू नका. खेळ व कलेमध्ये रमाल. अति भावुक होऊ नका. पराक्रमाला चांगला वाव आहे. नियोजना अभावी कामे रेंगाळू शकतात.

मीन:-आरोग्यात सुधारणा होईल. कामात अधिक स्फूर्ति येईल. मुलांसोबत दिवस खेळीमेळीत जाईल. उधारीचे व्यवहार करू नका. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2020 12:25 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 14 september 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, १३ सप्टेंबर २०२०
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, १२ सप्टेंबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२०
Just Now!
X