07 July 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, १५ जून २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-नवीन कामाचा बोझा अंगावर पडू शकतो. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. आर्थिक कमतरता भरून निघेल. मानसिक चंचलता दूर करावी.

वृषभ:-मनाजोगी खरेदी करता येईल. जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पहाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चारचौघांना प्रेमाने आपलेसे कराल. व्यावसायिक लाभाने सुखावून जाल.

मिथुन:-कामाचा व्याप वाढू शकतो. भावंडांची जबाबदारी अंगावर पडेल. अती कामामुळे बौद्धिक ताण जाणवेल. गोष्टी एकाच जागी खिळून पडल्यासारख्या वाटतील. क्षणिक मोहाला बळी पडू नका.

कर्क:-जवळच्या मित्रमैत्रिणींची गाठ पडेल. बर्‍याच दिवसांची इच्छा आज पूर्ण होईल. मानापमानाच्या प्रसंगांनी डगमगू नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. सामाजिक सेवेत हातभार लावाल.

सिंह:-शेअर्स मधून चांगला लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित कामांमधून आर्थिक मान वाढेल. जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. मनातील भलते सलते विचार काढून टाका. तुमच्यातील छुपे कलागुण सर्वांसमोर येतील.

कन्या:-जोडीदाराच्या प्रेमसौख्याला बहार येईल. मैत्रीचे संबंध अधिक घनिष्ट होतील. नियमांचे उल्लंघन करून चालणार नाही. पित्त विकारात वाढ संभवते. हातापायाला किरकोळ दुखापत होऊ शकते.

तूळ:-क्षुल्लक गोष्टींवरून चीडचीड कराल. मुलांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातील कौशल्य पणाला लागेल. जुगाराची आवड पूर्ण कराल. आळस झटकून कामे करावी लागतील.

वृश्चिक:-रेस, जुगारातून धनलाभ संभवतो. जमिनीच्या कामातून काही प्रमाणात लाभ होईल. वरिष्ठांशी मतभेदाचे प्रसंग टाळावेत. शांत व संयमी विचार करावा. आपली संगत एकवार तपासून पहावी.

धनू:-जवळचा प्रवास तूर्तास टाळावा. समोरील कामे आधी पूर्ण करावीत. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून खटका उडू शकतो. घरगुती कामात दिवसभर गुंतून पडाल. काही खर्च अचानक सामोरे येतील.

मकर:-क्षुल्लक अपयशाने खचून जाऊ नका. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. आर्थिक गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध रहा. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

कुंभ:-हलका व सकस आहार घ्यावा. वादाचे प्रसंग चिघळू शकतात. जोडीदाराशी समजुतीने वागावे लागेल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक गोष्टीपासून दूर राहू नका.

मीन:-दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. कामे जलद गतीने पूर्ण करण्यावर भर द्या. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. आवडत्या कलेचा आनंद घ्याल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 15th june 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, १४ जून २०२०
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, १३ जून २०२०
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १२ जून २०२०
Just Now!
X