• मेष:-
    ऐनवेळी येणाऱ्या अडचणी दूर कराल. जुगारात पडू नका. प्रेमप्रकरणात अडचण येवू शकते. वेळ चुकवून चालणार नाही. मुलांचे मनाविरुद्ध वागणे असेल.
  • वृषभ:-
    राहत्या घराचा प्रश्न सोडवाल. कौटुंबिक गैरसमज दूर करावेत. नोकरदारांना काही बदल करावे लागतील. वाहन चालवितांना सतर्कता द्यावी. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.
  • मिथुन:-
    व्यावसायिक गुंतवणूक कराल. अनेक कामे अंगावर येतील. धीराने सर्व बाबींचा विचार कराल. उत्तम गृहसौख्य लाभेल. मित्र-मैत्रिणींशी जवळीक वाढेल.
  • कर्क:-
    आध्यात्माकडे अधिक कल राहील. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीचा सल्ला घ्याल. परोपकाराने वागाल. सज्जन लोकांचा सहवास लाभेल. तुमच्या विचारांचा आदर केला जाईल.
  • सिंह:-
    कामाचे योग्य नियोजन करावे. काही वेळेस दोन पावले मागे येणे योग्य ठरते. काहीं कामे थोडा अधिक काळ घालवतील. मानसिक त्रास दूर करावा.
  • कन्या:-
    गुंतवणुकीतील फायद्याकडे लक्ष द्यावे. आपण कोणाच्या संगतीत आहोत हे लक्षात घ्यावे. जोडीदाराची नाराजी दूर करावी. झोपेची तक्रार दूर होईल. खर्च आवाक्याबाहेर जावू शकतो.
  • तूळ:-
    कौटुंबिक सौख्याचा विचार कराल. मध्यस्थीच्या कामातून चांगला फायदा संभवतो. तुमचा मान वाढेल. जमिनीच्या कामातून लाभ होईल. आरोग्यात सुधारणा होईल.
  • वृश्चिक:-
    व्यावसायिक शत्रुत्व ओढवून घेवू नका. कष्ट अधिक वाढू शकतात. तुमची अंगची चिकाटी उपयोगी ठरेल. मनीच्या आकांक्षा पूर्ण होतील. अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल.
  • धनु:-
    वडिलधाऱ्यांचा मान राखावा. कामासंबंधी वाटणारी चिंता दूर करावी. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होण्याचे कारण नाही. हातातील कामात अपेक्षेनुसार यश येईल असे नाही. वरिष्ठांचा मान राखावा.
  • मकर:-
    तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. अभ्यासूपणे गोष्टी समजून घ्याव्यात. शिस्तीचा बडगा करू नये. प्रवासाची आवड जोपासाल. बौद्धिक छंद जोपासाल.
  • कुंभ:-
    कफविकाराचा त्रास जाणवू शकतो. भावंडाना मदत करावी लागेल. जुनी येणी वसूल होतील. सासुरवाडीची मदत मिळेल. गुद्मार्गाच्या विकारांवर लक्ष द्यावी लागेल.
  • मीन:-
    दिवस आनंददायी असेल. कामात कोणीतरी खुसपट काढेल. काही कारणाने विकलता येईल. गटबाजी करू नये. मुख्यत: जोडीदाराला सांभाळा.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर