• मेष:-
    कौटुंबिक सौख्याचा दिवस. घरातील वातावरण आनंदी राहील. चांगले वाहन सौख्य मिळेल. कामाचा वेग वाढेल. दिवस मजेत जाईल.
  • वृषभ:-
    जवळचा प्रवास मजेत होईल. भावंडांचा प्रेमळ सहवास मिळेल. चांगले पुस्तक वाचनात येईल. जवळचे मित्र भेटतील. मनाची संवेदनशीलता दाखवाल.
  • मिथुन:-
    गुंतवणुकीचा पर्याय शोधाल. आवडते पदार्थ खायला मिळतील. सर्वांशी प्रेमळपणे बोलाल. कौटुंबिक खर्चाचा विचार कराल. घरात शांतता ठेवावी.
  • कर्क:-
    दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. प्रेमसंबंधात अरेरावी करू नये. मुलांची काळजी घ्यावी. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. वरिष्ठांची मर्जी राखावी.
  • सिंह:-
    हातातील अधिकार वापरावेत. कामातील ऊर्जा वाढेल. हाती घेतलेल्या कामात यश येईल. मैत्रीतील वाद वाढू देऊ नका. हित शत्रूंकडे लक्ष देऊ नका.
  • कन्या:-
    बोलतांना सावधगिरी बाळगावी. काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. कौटुंबिक खर्च वाढेल. वादविवादात भाग घेऊ नका. चोरांपासून सावध राहावे.
  • तूळ:-
    पित्त विकाराचा त्रास जाणवेल. उगाचच निराश होण्याचे कारण नाही. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. चैनीत दिवस घालवाल. मनाची चंचलता जाणवेल.
  • वृश्चिक:-
    मानापमानात अडकू नका. आवाक्याबाहेरील खर्च टाळावा. जोडीदाराची मर्जी राखावी लागेल. पायाचे त्रास जाणवतील. आरोग्याची काळजी घ्यावी.
  • धनु:-
    झोपेची तक्रार जाणवेल. कौटुंबिक कार्यक्रम होतील. काही गोष्टी क्षणिक असतील. उगाचच चिंता लागून राहील. सकारात्मकतेने विचार करावा.
  • मकर:-
    कामातील बदलांकडे सकारात्मकतेने पाहावे. कौटुंबिक सौख्य वाढेल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
  • कुंभ:-
    मोठ्या लोकांची संगत लाभेल. सरकारी कामात वेळ जाईल. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. बढतीसाठी प्रयत्न करायला हरकत नाही. कौटुंबिक समाधान लाभेल.
  • मीन:-
    अतिअपेक्षा करू नका. मुलांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. जवळचे मित्र भेटतील. सखोल चिंतन कराल. सांस्कृतिक गोष्टीत लक्ष घालाल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर