मेष:- कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे. देणी द्यावी लागतील. एकाच गोष्टीचा फार वेळ विचार करू नका. खेळात मन रमवाल. वृषभ:- व्यावसायिक आवक चांगली राहील. जुने मित्र भेटतील. मोठ्या भावाचे सहकार्य लाभेल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. शेतीच्या कामात यश येईल. मिथुन:- कामाचा विस्तार वाढवावा. कौतुकास पात्र व्हाल. शासकीय कामांकडे लक्ष द्यावे. पराक्रमाला वाव मिळेल. साहसाने कामे हाती घ्यावीत. कर्क:- दूरच्या प्रवासाचा योग येईल. तुमची प्रतिमा उंचावेल. घरात किरकोळ बदल कराल. कामातील तांत्रिक बाबी जाणून घ्याव्यात. उताविळपणा करू नका. सिंह:- कामाचा ताण वाढू शकतो. हट्टीपणा बाजूला सारून विचार करावा. ध्येयाचा पाठपुरावा करावा. काही कामे वेळ काढतील. मागे हटू नका. कन्या:- नैराश्य बाजूला सारून विचार करावा. काही वेळेस दोन पावले मागे येणे उत्तम. खर्चाकडे लक्ष द्यावे. सर्व बाबी उघडपणे मांडू नका. झोपेची तक्रार जाणवेल. तुळ:- हाताखालील व्यक्तींची उत्तम साथ मिळेल. कामातून समाधान शोधाल. विरोधकांवर मात कराल. जबाबदार व्यक्तींची ओळख होईल. व्यावसायिक फायदा जाणून घ्यावा. वृश्चिक:- मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. पैज जिंकता येईल. मैत्री अधिक घट्ट होईल. कामात अपेक्षित बदल कराल. काही गोष्टी सबुरीने घ्याव्यात. धनु:- कौटुंबिक गोष्टीत अधिक रस घ्याल. घरातील कामात वेळ निघून जाईल. बागकामाची आवड पूर्ण कराल. वरिष्ठांची नाराजी ओढवून घेवू नका. वडिलधाऱ्यांच्या शब्दाला मान द्यावा. मकर:- मुलाखतीत यश येईल. मध्यस्थाचे काम कराल. आवडते साहित्य वाचाल. सहकुटुंब जवळची सहल काढाल. जोडीदाराची बौद्धिक बाजू लक्षात येईल. कुंभ:- कौटुंबिक बाबीत अधिक लक्ष घालावे. मुलांचे कौतुक कराल. चुकीच्या संगतीत अडकू नका. गोड पदार्थ चाखायला मिळतील. मतभेद दर्शवू नका. मीन:- आरोग्यात सुधारणा होईल. कष्टाचे फळ मिळेल. कामातून समाधान लाभेल. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. चुगली करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर