25 October 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, १९ ऑक्टोबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-अनीतिचा मार्ग अवलंबू नका. साधा व सोपा मार्ग स्वीकारा. भौतिक विकास होऊ शकेल. व्यवसाय विस्ताराच्या कल्पनांना मूर्त रूप द्या. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.

वृषभ:-मनातील शंका काढून टाकाव्यात. त्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका. नवीन योजनांकडे अधिक लक्ष द्या. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. धीराने कामे करावीत.

मिथुन:-घरात नवीन खरेदी केली जाईल. हातून काही कल्पक कार्य घडेल. कलेचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळवाल. जोडीदारासोबत उत्तम काळ व्यतीत कराल.

कर्क:-योग्य वेळी बुद्धीचा वापर करावा. आजाराकडे दुर्लक्ष करू नका. मोठ्या अधिकार्‍यांचा हस्तक्षेप उपयोगी ठरेल. कार्यालयातील सहकारी सहकार्य करतील. भावंडांचा सल्ला मोलाचा ठरेल.

सिंह:-कपटी लोक ओळखून वागा. विनाकारण खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या. दिवस व्यस्त राहील. नवीन जबाबदारी खांद्यावर पडू शकते. सर्वांशी गोडीने वागाल.

कन्या:-विद्यार्थ्यांना परिश्रमाचा काळ. सोप्या वाटणार्‍या गोष्टी सहजपणे घेऊ नका. वादाचे प्रसंग टाळावेत. हितशत्रूंपासून सावध राहावे. आपण आणि आपले काम एवढेच पहा.

तूळ:-घरातील कार्य मार्गी लागतील. कामात एखाद्याचा हस्तक्षेप घ्यावा लागेल. व्यवहारासंबंधी मुद्दे मार्गी लावा. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा. जुने वाद मिटू शकतील.

वृश्चिक:-गुंतवणुकीसाठी योग्य काळ. पुढील पाऊल उचलताना तज्ञांचा सल्ला घ्यावा. सकारात्मक विचार करावा. मानसिक प्रसन्नता लाभेल. कार्यक्षेत्रात नवीन विचार घेऊन जाल.

धनू:-उद्योगात जोखीम पत्करून काम करावे लागेल. दैनंदिन कामात थोडा बदल करून पहावा. कौटुंबिक समस्या धीराने सोडवा. विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवावी. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.

मकर:-जोडीदाराच्या खुशालीसाठी खर्च कराल. भागिदारीतून लाभ मिळेल. कामात अपेक्षित परिवर्तन दिसून येईल. वादाचे प्रसंग टाळावेत. एखादी सकारात्मक वार्ता मिळेल.

कुंभ:-कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. व्यापारी वर्गाला सुखद दिवस. नवीन ओळख होईल. वडीलांचे मार्गदर्शन घ्यावे. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा.

मीन:-सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आपल्या बोलण्यात मृदुता ठेवा. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. कामातील काही समस्या सुटतील. बौद्धिक चातुर्य वापरावे लागेल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2020 12:07 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 19 october 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, १८ ऑक्टोबर २०२०
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, १७ ऑक्टोबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२०
Just Now!
X