मेष

संध्याकाळी महादेवाचे दर्शन घ्यावे, पशुपालकांना अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण वॄश्चिक राशीमध्ये असेल. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. सर्वांचे सहकार्य लाभेल. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. कायदेशीर गोष्टींमध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत. वरिष्ठांची मर्जी राखावी.
आजचा रंग –नारंगी

वृषभ

ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वॄश्चिक राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये प्रगताीकारक ग्रहमान आहे. आर्थिक योजनांचा पाठपुरावा करावा. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. कोर्ट प्रकरणांमध्ये यश येण्याची शक्यता आहे.
आजचा रंग – आकाशी

मिथुन

कुलदैवतेचे स्मरण करून दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वॄश्चिक राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेचे आणि वाताचे विकार असलेल्या मंडळींनी दक्षता घ्यावी. आर्थिक व्यवहार जपून करावे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग –पांढरा

कर्क

ओम नम: शिवाय जप सुरू ठेवावा. आज चंद्राचे भ्रमण वॄश्चिक राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेवू शकाल. जमिनीमधील गुंतवणुकीस अनुकूल ग्रहमान आहे. सर्वांचे सहकार्य लाभेल. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. समाजकारण, राजकारणातील व्यक्तींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –गडद पिवळा

सिंह

ओम सोमाय नम: या मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण वॄश्चिक राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. कुटूंबाशी निगडीत अडीअडचणी सोडविता येतील. व्यवसायामध्ये आर्थिक स्थिती उत्तम राहील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यावसायिकांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. राहत्या घराचा प्रश्न सोडवू शकाल.
आजचा रंग -नारंगी

कन्या

ओम नम: शिवाय जप दिवसभर मनातल्या मनात सुरू ठेवावा. आज चंद्राचे भ्रमण वॄश्चिक राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये स्पर्धा तीव्र होतील. भावंडांच्या गाठीभेटी होतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळवेत.
आजचा रंग –नेव्ही ब्ल्यू

तुळ

महादेवाच्या मंदिरात अभिषेक करावा. आज चंद्राचे भ्रमण वॄश्चिक राशीमध्ये असेल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दॄष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय योग्य ठरतील. आनंदी दिवस जार्इल. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग -नारंगी

वृश्चिक

ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वॄश्चिक राशीमध्ये असेल. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. व्यवसाय, नोकरीमधील बदलांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग संभवतात. सर्वांचे सहकार्य लाभेल. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे.
आजचा रंग –पोपटी

धनु

ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वॄश्चिक राशीमध्ये असेल. सर्वांचे सहकार्य प्राप्त होर्इल. लोखंडाशी निगडीत कारखानदारांनी कामगारांशी सलोखा बाळगावा. वादविवाद टाळावेत. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना वरिष्ठांशी चर्चा करावी. वाहन जपून चालवावे.
आजचा रंग –नारंगी

मकर

महादेवाच्या मंदिरात धान्य आणि पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण वॄश्चिक राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी निर्णय घेण्याच्या दॄष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. मित्र मंडळींमध्ये वेळ आनंदात जार्इल. कमोडिटी मार्केट, शेअर्स, शेतीशी निगडीत व्यावसायिकांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –आकाशी

कुंभ

ओम नम: शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू ठेवावा. आज चंद्राचे भ्रमण वॄश्चिक राशीमध्ये असेल. अधिकार संपन्नता प्राप्त होर्इल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा दबदबा वाढेल. सामाजिक प्रतिष्ठेचे योग आहेत. महत्त्वपूर्ण योजना राबविता येतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग- राखाडी

मीन

महादेव मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण वॄश्चिक राशीमध्ये असेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे. वाहन सौख्य लाभेल. सर्वांचे सहकार्य लाभेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
आजचा रंग – तपकिरी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu