28 February 2021

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, २० जानेवारी २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष:-
    कौटुंबिक सौख्य जपावे. उगाचच चीड-चीड करू नका. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नयेत. गुरु कृपेचा लाभ होईल. शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील.
  2. वृषभ:-
    जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. पोटाचे त्रास संभवतात. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा. कला जोपासायला वेळ द्यावा. वडीलधार्‍यांचा विरोध होऊ शकतो.
  3. मिथुन:-
    खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. जोडीदाराची प्रगल्भता लक्षात येईल. हातातील कामात यश येईल. उष्णतेचा त्रास संभवतो.
  4. कर्क:-
    मुलांशी मतभेद संभवतात. वात-विकाराचा त्रास जाणवेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. एकमेकांचे मत समजून घ्यावे. कामानिमित्त प्रवास घडेल.
  5. सिंह:-
    घरातील शांतता जपावी. कर्जप्रकरणे पुढे ढकला. तूर्तास जमिनीची कामे करू नयेत. मुलांची प्रगती दिसून येईल. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल.
  6. कन्या:-
    जवळचे मित्र भेटतील. लहान प्रवास घडेल. कामाला अधिक हुरूप येईल. उपासनेला अधिक बळ मिळेल. बौद्धिक दिमाख दाखवाल.
  7. तूळ:-
    वाहन चालवताना काळजी घ्यावी. तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. आवडी-निवडी बाबत जागरूक राहाल. बोलतांना सावधगिरी बाळगा. कौटुंबिक खर्च वाढेल.
  8. वृश्चिक:-
    रागाचा पारा चढू देवू नका. आततायीपणा करू नये. इतरांची मदत घेण्यास हरकत नाही. योग्य तारतम्यता बाळगावी. घरात मानाने राहाल.
  9. धनू:-
    मानसिक चंचलता जाणवेल. घरातील जबाबदारी उचलाल. गोड बोलून कार्यभाग साधावा. खर्चाचे प्रमाण लक्षात घ्यावे. घशाचा त्रास संभवतो.
  10. मकर:-
    स्वत:चे स्वत्व राखून वागाल. वागण्यातून आत्मविश्वास दर्शवाल. जुन्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. कणखरपणा ठेवावा. मित्रांशी वाद संभवतात.
  11. कुंभ:-
    इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. सर्वांशी हसून-खेळून वागाल. छंदाला अधिक वेळ द्याल. प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. व्यावसायिक बदल कराल.
  12. मीन:-
    वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. मनातील इच्छा पूर्ण होतील. सामाजिक बाबीत पुढाकार घ्याल. मुलांची प्रगती दिसून येईल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 20 january 2020 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, १९ जानेवारी २०२०
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, १८ जानेवारी २०२०
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १७ जानेवारी २०२०
Just Now!
X