12 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, २० जुलै २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-हातून एखादे चांगले काम होईल. प्रयत्नात कसूर करून चालणार नाही. जुन्या मित्रांसोबत दिवस मजेत घालवाल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. उत्तम कौटुंबिक सौख्य मिळेल.

वृषभ:-हाती घेतलेल्या कामाकडे आधी लक्ष द्यावे. अरबट-चरबट खाऊ नका. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. दिवसभर काहींना-काही काम मागे राहील. गोड बोलून कार्यभाग साधाल.

मिथुन:-प्रसन्नता पूर्वक दिवसाची सुरुवात होईल. अधिक उत्साहाने कामे कराल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवाल. दिवस चांगला जाईल.

कर्क:-मनात अनामिक चिंता निर्माण होईल. भावनेच्या आहारी जाऊ नये. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. फसवणुकीपासून सावध राहावे. अति श्रमामुळे थकवा जाणवेल.

सिंह:-चांगले मानसिक स्वास्थ लाभेल. आंतरिक सृजनशीलता लाभेल. काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी दाटून येईल. जवळचे मित्र भेटतील. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल.

कन्या:-कामाची धांदल उडेल. आपल्याला सातत्याची गरज भासेल. वेळ आणि काम यांचा मेळ घालावा. स्वत:च्या फायद्याकडे अधिक लक्ष द्याल. हातातील कामे सुरळीत पार पडतील.

तूळ:-धार्मिक अनुष्ठान साधाल. परोपकारातून परमार्थ साधता येईल. कमी श्रमातून अधिक फायद्याचा विचार कराल. गोड बोलण्याला भुलून जाऊ नका. आत्मविश्वास वाढीस लागेल.

वृश्चिक:-नातलगांची गाठ पडेल. तुमच्यातील क्रोधाला खतपाणी घातले जाईल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा लागेल. चटकन कोणत्याही निष्कर्षावर येऊ नका. मित्रांना दुखावून चालणार नाही.

धनू:-मुलांच्या सौख्यात आनंद मानाल. जुनी कामे नव्याने अंगावर येतील. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. सुरस भोजनाची प्राप्ती होईल. जोडीदाराकडून समाधान मिळेल.

मकर:-तब्येतीच्या किरकोळ तक्रारी कमी होतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. धार्मिक व्यवहारात लक्ष घालाल. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. इतरांचा विश्वास संपादन करावा.

कुंभ:-नवीन कामे अंगावर येतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. दिवस गप्पा-गोष्टींमध्ये घालवा. आपल्या मनातील गुज मोकळेपणाने सांगावे. फक्त शब्दांची धार लक्षात घ्यावी.

मीन:-कामात चांगली सफलता मिळेल. व्यापार्‍यांची येणी वसूल होईल. पत्नीशी मतभेदाची शक्यता. मुलांचे विचार जाणून घ्यावेत. घाईने केलेले काम चुकू शकते.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2020 12:43 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 20th july 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, १९ जुलै २०२०
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, १८ जुलै २०२०
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १७ जुलै २०२०
Just Now!
X