05 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, २१ ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:- मनसैरभैर होणार नाही याची दक्षता घ्यावी. दुचाकी वाहन चालवितांना काळजी घ्यावी.पोटाच्यातक्रारी दुर्लक्षून चालणार नाहीत. जोडीदाराचा मान वाढेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

वृषभ:- जुन्याप्रकरणात हात घालावा लागेल.मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे.आरोग्यात सुधारणा होईल. कामेमना जोगी पार पडतील. इतरांचा विश्वास संपादन करावा.

मिथुन:- मनाची चंचलता जाणवेल.बोलण्यातून जवळीक साधाल. प्रेमसौख्यात भर पडेल. कलेतून चांगली आर्थिक कमाई होईल. मैत्रीचे संबंध सुधारतील.

कर्क:- चित्तचांचल्य जाणवेल. घरगुती गोष्टीत अधिक लक्ष घालावे. दिवस ऐषारामात घालवाल.शेतीवाडीतून चांगली आर्थिक कमाई होईल.आवडीचे पदार्थ चाखाल.

सिंह:- घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवावे.बोलतांना सावधानता बाळगावी. फसवणुकीपासून सावध राहावे. कामात तत्परता दाखवाल. मत्सराला बळी पडू नका.

कन्या:- उष्णतेचे विकार जाणवू शकतात.खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे.कामात किरकोळ अडचणी येवू शकतात. उगाच कोणाशीही शत्रुत्व पत्करायला जावू नका. अकारण आलेली निराशा झटकून टाकावी.

तूळ:- कामाची धावपळ वाढेल. काही कामे खीळ बसल्या सारखी अडूनराहू शकतात. गायन कलेतून चांगला फायदा होईल.अनावश्यक खर्च टाळावा. सामाजिक बांधिलकी जपावी.

वृश्चिक:- काही गोष्टी क्षणिक आनंद देतील. प्रेम सौख्यात वाढ होईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मैत्रीत सलोखा ठेवावा.

धनु:-बदलांपासून दूर पळू नका. मनातील इच्छा पूर्ण करण्यावर लक्षद्या. नवीन ओळखी होतील. कामातून अपेक्षित धनलाभ होईल.मोठ्या लोकांच्या भेटी घडतील.

मकर:-  मानसिकसौख्य चांगले लाभेल.आर्थिक मानसुधारेल. किरकोळअडचणीतून मार्ग काढाल.कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्याल.अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल.

कुंभ:- नवीन मित्र जोडावेत. विचारांनावेगळी दिशा देवून पहावी.वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. गुरु कृपेचा लाभ घ्यावा. कौटुंबिक सौख्यात भर पडेल.

मीन :- कामात चलबिचलता आणू नका.काही गोष्टी दुर्लक्षित करता आल्यातर पहाव्यात. जोडीदारा विषयी मनातील ग्रह बाजूला सारावा.आरोग्याची काळजी घ्यावी. दान धर्मकराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2019 8:15 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 21 october 2019 nck 90
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, २० ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, १९ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १८ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X