27 May 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, २३ सप्टेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  मानसिक स्थैर्य जपावे. फसवणुकीपासून सावध राहावे. मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्यावेत. वेळेचे भान राखावे. स्त्रीवर्गापासून सावध राहावे.
 • वृषभ:-
  रेस, जुगार यांपासून दूर राहावे. नवीन मित्र जोडाल. कामाच्या पद्धतीचे कौतुक केले जाईल. कौटुंबिक समाधान लाभेल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमवाल.
 • मिथुन:-
  मानसिक चांचल्य दूर करण्याचा प्रयत्न करावा. नसते विचार करू नका. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. धैर्य वाढीस लागेल. हातापायाच्या इजांकडे दुर्लक्ष करू नये.
 • कर्क:-
  उधळपट्टी करू नये. तडकाफडकी कोणतीही गोष्ट करू नका. सारासार विचार करूनच बोलावे. स्वभावात लहरीपणा जाणवेल. आपण श्रम करण्यात मागे पडणार नाही.
 • सिंह:-
  भाजणे, कापणे यांसारचे त्रास होवू शकतात. जोमाने कामे कराल. हुकुमत गाजविण्याचा प्रयत्न कराल. कामात उताविळपणा करू नये. चटकन रागवू नये.
 • कन्या:-
  सामुदाईक वादात अडकू नका. उष्णतेचे विकार जाणवतील. प्रवासात वाहन चालवितांना काळजी घ्यावी. जोडीदाराचा वरचष्मा राहील. अघल-पघल बोलणे टाळावे.
 • तूळ:-
  अति उत्साह दाखवू नका. झोपेची तक्रार जाणवेल. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. सतत काहीनाकाही काम करत राहाल. मुलांच्या दुखण्याकडे लक्ष द्यावे.
 • वृश्चिक:-
  बदलला सकारात्मकतेने पहावे. अविचाराने वागू नका. सतत वरचा दर्जा मिळविण्याचा प्रयत्न कराल. परिस्थितीवर संघर्षाने मात कराल. तुमच्यातील झुंझारपणा दिसून येईल.
 • धनु:-
  जुनाट पद्धतीने विचार कराल. प्रतिकुलतेतून योग्य मार्ग काढाल. चटकन निराश होण्याचे कारण नाही. जोडीदाराशी गप्पा मारण्यात रमून जाल. नवीन लोकांशी ओळख वाढेल.
 • मकर:-
  कामातून समाधान शोधाल. काही गोष्टींना उशिरा वाव मिळेल. योग्य संधीची वाट पहावी. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. मनातील आशा-निराशा यांचे द्वंद्व चालू राहील.
 • कुंभ:-
  आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. काटकसर करण्यावर भर द्याल. एकांगी विचार करू नयेत. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. शांततेचे धोरण स्वीकारावे.
 • मीन:-
  घरातील गोष्टींमध्ये विशेष लक्ष घालावे. जोडीदाराची प्रगती होईल. भागीदारीत चांगला फायदा संभवतो. पुराणमतवादी विचार मांडाल. स्वत:बद्दलच्या चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 23 september 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, २२ सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, २१ सप्टेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २० सप्टेंबर २०१९
Just Now!
X