News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, २५ नोव्हेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. वैवाहिक सौख्यकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. भागिदाराशी समजुतीने वागावे. चारचौघात भडक मत प्रदर्शित करू नका. गुरुकृपेचा लाभ घ्यावा.
 • वृषभ:-
  उगाचच चिडचिड करू नये. इतरांच्या वागण्याचा फार विचार करत बसू नये. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. जिद्दीने कामे पार पडाल.
 • मिथुन:-
  गोष्टी वेळेवर करण्यावर भर द्यावा. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. प्रेमप्रकरणात कटकट निर्माण होऊ शकते. नातेवाईकांशी वाद घालू नयेत. मित्रांची बाजू समजून घ्यावी.
 • कर्क:-
  कौटुंबिक गोष्टी चिघळू देऊ नयेत. घरातील वातावरण शांत ठेवावे. प्रवासात काळजी घ्यावी. वरिष्ठांचे धोरण कडक राहू शकते. संयम बाळगावा लागेल.
 • सिंह:-
  हातापयास किरकोळ इजा होऊ शकते. जवळचा प्रवास सावधानतेने करावा. काही अनावश्यक खर्च टाळावेत. हिमतीच्या बळावर कामे हाती घ्याल. कर्तबगारीला वाव आहे.
 • कन्या:-
  स्वभावात उधळेपणा येऊ शकतो. योग्य नियोजनाशिवाय पर्याय नाही. मागचा-पुढचा विचार करावा लागेल. गुंतवणूक करतांना सतर्कता बाळगावी. रागावर नियंत्रण ठेवावे.
 • तूळ:-
  फार हट्टीपणा करू नका. कार्यक्षमता वाढीस लागेल. क्षुल्लक गोष्टींवरून गैरसमज वाढू शकतात. कामातील अडचणी प्रयत्नाने दूर कराव्यात. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.
 • वृश्चिक:-
  मनाची अवस्था चंचल राहील. ध्यानधारणा करण्यात वेळ व्यतीत करावा. उगाच सगळ्या गोष्टीत लक्ष घालत बसू नका. सामाजिक बांधिलकी जपावी. वादाच्या प्रसंगांपासून दूर राहावे.
 • धनु:-
  नवीन कामात अपेक्षित यश मिळेल. तुमच्या गुणांचे कौतुक केले जाईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. अंगीभूत कलेचा प्रसार करता येईल. मनातील भावना उत्तम प्रकारे मांडू शकाल.
 • मकर:-
  घरातील कामात अधिक लक्ष घालावे लागेल. क्षुल्लक गोष्टींवर फार चर्चा करू नका. जुन्या गोष्टींचा मनावर ताण घेऊ नका. चैनीत वेळ घालवाल. क्षणिक सौख्य लाभ होईल.
 • कुंभ:-
  मोठ्या लोकांचा आशीर्वाद मिळेल. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. प्रवासात सावधगिरी बाळगावी. कामाची नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही.
 • मीन:-
  पोटाचे त्रास उदभवू शकतात. आरोग्याच्या तक्रारी दुर्लक्षित करू नका. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. नवीन कामे मिळतील. व्यवसायात वाढ करता येईल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 25 november 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, २४ नोव्हेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, २३ नोव्हेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २२ नोव्हेंबर २०१९
Just Now!
X