04 December 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, २८ ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्याल. प्रेमसौख्याला बहर येईल. एकमेकांतील ओढ वाढेल. भागादारीतून चांगला फायदा संभवतो. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
 • वृषभ:-
  कामाला उत्तम गतिमानता येईल. कामाच्या ठिकाणी तुमचा नावलौकिक होईल. सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळेल. जवळची माणसे भेटतील. आरोग्यात सुधारणा होईल.
 • मिथुन:-
  मैत्रीतील आपुलकी वाढेल. घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. करमणूक प्रधान गोष्टींकडे कल राहील. हातचलाखी दाखवाल. कलेचे कौतुक केले जाईल.
 • कर्क:-
  घरात तुमचा दरारा असेल. स्वच्छतेवर अधिक लक्ष द्याल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. हातापायांची काळजी घ्यावी. अधिकाराचा योग्यवेळी वापर करावा.
 • सिंह:-
  फसवणुकीपासून सावध राहावे. कोणाचाही रोष ओढवून घेवू नका. सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतीलच असे नाही. हस्तकलेची चुणूक दाखवाल. जवळचा प्रवास मजेत होईल.
 • कन्या:-
  अडचणीतून मार्ग काढाल. निराश होण्याचे कारण नाही. भाजणे, कापणे यांसारखे त्रास जाणवतील. तिखट, तामसी पदार्थ खाणे टाळावे. वादात अडकू नका.
 • तूळ:-
  प्रेमसौख्याचा दिवस राहील. व्यावसायिकांना चांगला लाभ होईल. व्यापारीवर्ग नवीन योजना आखतील. काही किरकोळ अडचणी संभवतात. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.
 • वृश्चिक:-
  काही प्रसंग क्षणिक आनंद देतील. मानसिक सौख्य लाभेल. कोणत्याही गुंत्यात अडकू नका. आर्थिक व्यवहार सावधगिरीने करावेत. काही गोष्टींचा स्वत:पुरता विचार कराल.
 • धनु:-
  अधिकारी व्यक्तींची मदत मिळेल. उत्तम स्त्रीसौख्य लाभेल. दिवस मानाजोगा व्यतीत कराल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. ऐषारामाच्या वस्तू खरेदी कराल.
 • मकर:-
  काही अडचणी आल्या तरी त्यावर मात करता येईल. चांगला आर्थिक फायदा होईल. हातातील कामात यश येईल. चांगली संगत लाभेल. मोठ्या लोकांच्यात वावराल.
 • कुंभ:-
  मनातील अनामिक भीती दूर करावी. कामाच्या ठिकाणी आपली पत सांभाळावी. वडिलधाऱ्या व्यक्तींचा मान ठेवावा. कामात चिकाटी ठेवावी. मागे हटू नये.
 • मीन:-
  जमिनीच्या कामात लक्ष घालाल. अचानक धनलाभ संभवतो. कामाचा योग्य मोबदला मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. उगाचच होणारी चिडचिड टाळावी.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 28 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, २७ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, २६ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २५ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X