• मेष:-
    व्यवहार कुशलता दाखवाल. जोडीदाराच्या सुस्वभाविपणाचे कौतुक कराल. तिरसटपणे वागू नका. करमणुकीवर अधिक लक्ष द्याल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील.
  • वृषभ:-
    कौटुंबिक कार्यक्रम व्यवस्थित पार पडतील. दिवस खेळकरपणे जाईल. इतरांचा विश्वास संपादन करावा लागेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत अडकाल. व्यापाऱ्यांनी काटेकोरपणे वागावे.
  • मिथुन:-
    घरातील आवराआवर करण्यात वेळ जाईल. अति चिकित्सा करू नका. बौद्धिक छंद जोपासा. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. घरात नातेवाईक गोळा होतील.
  • कर्क:-
    नवीन मित्र जोडाल. नातेवाईकांच्यात उठबस वाढेल. ज्येष्ठांची चांगली मदत मिळेल. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. सर्वांची यथायोग्य विचारपूस कराल.
  • सिंह:-
    चौकसपणे गोष्टी जाणून घ्याल. तुमचा तर्क योग्य निघेल. लहान प्रवास कराल. विचार आणि बुद्धी यांची सांगड घालाल. उत्कृष्ट परीक्षण कराल.
  • कन्या:-
    तुमच्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव पडेल. गायन कलेची आवड जोपासाल. मध्यस्थीचा फायदा होईल. आपला फायदा चलाखीने काढून घ्याल. गोड बोलून कामे पूर्ण करून घ्याल.
  • तूळ:-
    इतरांच्या सल्ल्याने वागू नये. हातातील अधिकाराचा योग्यवेळी वापर करावा. नवीन गोष्टी आवडीने जाणून घ्याल. हजरजबाबीपणे वागणे ठेवाल. कामात तत्परता दाखवाल.
  • वृश्चिक:-
    कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्यावीत. मनाजोगा आर्थिक लाभ होईल. कामात स्त्रीवर्गाचा हातभार लागेल. सचोटीने कामे करण्यावर भर द्याल. प्रवासाची आवड पूर्ण कराल.
  • धनु:-
    गप्पिष्ट लोकांमध्ये रमाल. लहानांशी खेळण्यात रमून जाल. व्यापाऱ्यांना चांगला फायदा संभवतो. तरुणांची मते जाणून घ्याल. प्रकृतीची वेळेवर तपासणी करावी.
  • मकर:-
    कल्पकतेने मार्ग काढाल. व्यावहारिक चातुर्य दाखवाल. पुढील परिस्थितीचा अंदाज घ्याल. तुमचा संपर्क वाढेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी.
  • कुंभ:-
    शिस्तीने वागणे पसंद कराल. बोलण्याने सर्वांना अचंबित कराल. बैठ्या खेळात यश येईल. व्यावसायिक ज्ञान वाढवाल. अभ्यासूपणे गोष्टी जाणून घ्याल.
  • मीन:-
    कफविकाराचा त्रास जाणवू शकतो. अतिविचार करत बसू नका. तुमचे अनुमान योग्य ठरतील. प्रेमळ संबंधात रंगून जाल. जोडीदाराचा हट्ट पुरवाल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर