19 September 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, ३१ ऑगस्ट २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष:-
  बरेच दिवस राहून गेलेली गोष्ट वाचनात येईल. खर्च बेताचा ठेवावा. कामात अधिक चिकाटी ठेवावी लागेल. दिनक्रम अतिशय व्यस्त राहण्याची शक्यता. हाती आलेली कामे पूर्ण होतील.
 2. वृषभ:-
  समजून-उमजून गुंतवणूक करावी. चांगले साहित्य वाचनातून आनंद मिळेल. मन प्रसन्न राहील. जुने विचार बाजूला सारावे लागतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
 3. मिथुन:-
  गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. हातातील अधिकार लक्षात घेऊन वागावे. जुनी येणी वसूल होतील. मित्रांची भेट घेणे शक्य होईल. अनामिक भीती दूर सारावी.
 4. कर्क:-
  जोडीदाराशी सहमत राहावे लागेल. आरोग्याची पथ्ये पाळावीत. खोटेपणाचा आधार घेऊ नका. जबाबदारी टाळून चालणार नाही. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी मतभेदाची शक्यता.
 5. सिंह:-
  आत्मविश्वास कायम ठेवावा. नोकरीतील जुनी कामे मार्गी लागतील. कामातून समाधान शोधाल. एकाच गोष्टीवर अडून राहू नका. गोड बोलून मने जिंकून घ्याल.
 6. कन्या:-
  उत्तम गृहसौख्य लाभेल. फक्त कामावरच लक्ष केंद्रीत करावे. झोपेची तक्रार जाणवेल. महत्त्वाच्या गोष्टींची नोंद ठेवावी. व्यावसायिक ठिकाणी आपल्या कामाशीच प्रामाणिक रहा.
 7. तूळ:-
  घरातील कामात दिवस जाईल. महत्त्वाची कामे प्रलंबित पडू शकतात. जोडीदाराची इच्छा पूर्ण करावी लागेल. थोडीफार चिडचिड होण्याची शक्यता. मित्रमंडळींशी संवाद साधावा.
 8. वृश्चिक:-
  उत्साह कायम ठेवावा. मनात बरेच दिवसांपासून घोळत असलेली इच्छा आमलात आणाल. अधिकारी व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. पोटाची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.
 9. धनू:-
  आपले व्यक्तिमत्व जपण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवा. वेगळा विचार करून पाहावा. व्यापारी वर्गाला दर्जा सुधारता येईल. ज्येष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल.
 10. मकर:-
  तुमचे मनोबल उंचावेल. जोडीदाराविषयी मनात उगाच ग्रह करून घेऊ नका. उतावीळपणा करून चालणार नाही. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. मनातील इच्छा साकारता येईल.
 11. कुंभ:-
  उत्कृष्ट कलेचा अनुभव घ्याल. उतावीळपणाने वागून चालणार नाही. मन काहीसे चंचल राहील. प्रेमसंबंध सुधारतील. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल.
 12. मीन:-
  उत्साह व धडाडी योग्य कारणासाठी वापरा. चांगले मित्र ओळखा व पारखून घ्या. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. सौम्य शब्दांचा वापर करावा. घरात टापटीप ठेवाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 12:33 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 31th august 2020 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, ३० ऑगस्ट २०२०
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, २९ ऑगस्ट २०२०
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२०
Just Now!
X