मेष:-सामाजिक भान राखून वागाल. आरोग्यात सुधारणा होईल. दिनक्रम व्यस्त राहील. जोडीदाराशी ताळमेळ साधाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

वृषभ:-परनिंदा चांगली नाही. वाहन जपून चालवा. व्यवहारात पारदर्शकता हवी. घरातील जबाबदारी पार पाडाल. मेहनतीला योग्य फळ मिळेल.

मिथुन:-समोरच्या व्यक्तिला जाणून घ्या. आर्थिक गणित जमेल. अगोचरपणा करून चालणार नाही. टीमवर्क मधून कामे पूर्ण होतील. मनातील प्रेमभावना वाढीस लागेल.

कर्क:-अविश्वास दाखवू नका. अति आनंदाच्या भरात शब्द देऊ नका. साहस करताना सारासार विचार करावा. मानसिक शांतता लाभेल. वरिष्ठांचे शब्द प्रमाण मानून चालावे.

सिंह:-मनातील इच्छा पूर्ण होईल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. वादाच्या मुद्यात जिंकाल. दिवस अनुकूल जाईल. हाताखालील लोकांचे सहकारी मिळेल.

कन्या:-काही चांगल्या बातम्या कानावर येईल. अधिकारी वर्ग खुश राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने भारावून जाल. जुनी कामे मार्गी लागतील. अति जोखीम पत्करू नका.

तूळ:-नवीन संधी चालून येईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. भावंडांना मदत करावी लागेल. उधारी चुकती कराल. मानसिक चिंता वाढू शकते.

वृश्चिक:-झालेली चूक काबुल करावी लागेल. अति हुरळून जाऊ नये. आपले मत इतरांवर लाडू नका. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

धनू:-ठाम निर्णय घ्यावेत. अति भावनाविवश होऊ नका. कामे थांबू नयेत याची काळजी घ्या. ज्येष्ठाशी वाद टाळावेत. कलाक्षेत्रात प्रशंसा होईल.

मकर:-नसत्या फंदात पडू नका. कामे संथ गतीने पार पडतील. कामात उत्साह जाणवेल. मनातील बोलण्यासाठी उत्तम वेळ आहे. नवीन वलय प्राप्त होईल.

कुंभ:-भावनेला आवर घालावी लागेल. सामाजिक सेवेत सहभाग घ्याल. भडक शब्द वापरणे टाळावे. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा. मानसिक शांतता जपावी.

मीन:-मौलिक सल्ला घ्यावा लागेल. कामाचा वेळ वाढवावा लागेल. स्वत:च्याच विश्वात रमून जाल. मेहनतीला योग्य फळ मिळेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर