05 June 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, ६ एप्रिल २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-कौटुंबिक सौख्य चांगले राहील. बोलण्यातून इतरांवर छाप पडाल. गायन कलेला चांगला दर्जा मिळेल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधावा.

वृषभ:-वैवाहिक सौख्यात भर पडेल. जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पाहाल. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षकता येईल. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. नटण्या मुरडण्याची हौस भागवाल.

मिथुन:-जवळचा प्रवास करावा लागेल. भावंडांची उत्तम साथ लाभेल. सहकुटुंब दिवस मजेत घालवाल. सरकारी कामात वेळ जाईल. वाचनाची आवड पूर्ण कराल.

कर्क:-स्त्रियांशी मैत्री वाढेल. नवीन गोष्टींचे आकर्षण वाढेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. मनातील रुक्षपणा काढून टाकावा.

सिंह:-इतरांवर तुमची छाप पडेल. चंचलतेवर मात करावी. व्यापारी वर्गाला फायदा संभवतो. जोडीदाराची व्यवहारकुशलता दिसून येईल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल.

कन्या:-आवडते ग्रंथ गोळा कराल. धार्मिक कामात सहकार्य कराल. भौतिक गोष्टींकडे कल राहील. शैक्षणिक कामे पूर्ण होतील. काही नवीन अनुभव गाठीशी बांधाल.

तूळ:-रेस सट्टा यांतून धनलाभ संभवतो. नातेवाईकांची मदत घेता येईल. कामे वेगात पूर्ण करता येतील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. फसवणुकीपासून सावध राहा.

वृश्चिक:-गैरसमजुतीतून मानसिक त्रास वाढू शकतो. गरज असेल तरच प्रवास करा. व्यवसायवृद्धीचा विचार करा. भावंडांचे प्रश्न समोर येतील. हातून एखादे सत्कार्य घडेल.

धनू:-मनाची संवेदना दाखवाल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. आध्यात्मिक प्रगती करता येईल. कौटुंबिक समस्या जाणून घ्यावात. जुन्या कामातून फायदा संभवतो.

मकर:-काही गोष्टी अनपेक्षित घडू शकतात. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. आर्थिक व्यवहारात सतर्कता दाखवावी. उधार उसनवारीचे व्यवहार टाळावेत. उगाचच चीड-चीड करू नये.

कुंभ:-मनातील निराशा बाजूस सारावी. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. अती भावनाशील होऊ नका. ध्यान धारणेत वेळ घालवाल. डोळ्यांची काळजी घ्यावी.

मीन:-कामात उगाचच अडकून पडल्यासारखे वाटेल. लबाड लोकांपासून दूर राहा. अती काळजी करू नका. सार्वजनिक कामात मदत कराल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 12:50 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 6th april 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, ५ एप्रिल २०२०
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, ४ एप्रिल २०२०
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ३ एप्रिल २०२०
Just Now!
X