21 January 2021

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, ७ डिसेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष : आज आपले अंदाज चुकतील कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने आपण घेतलेले निर्णय योग्य असले तरी त्यांची अमलबजावणीकरणे टाळावे. नोकरीत वरिष्ठ महत्वाच्या कामांची जबाबदारी सोपवतील. भावाबहिणींशी वागताना भावनिक उद्रेक होणार नाही याची दक्षता घ्या. जवळचे प्रवास सुखकर होतील.

वृषभ : कौटुंबिक कलह टाळावेत. नोकरीत कामाचा ताण जाणवेल, आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. उधारी उसनवारी वसूल होईल. अनपेक्षित धनलाभ झाल्याने आश्चर्याचा धक्का बसेल.

मिथुन : आपले पूर्वी ठरलेले प्रवास अचानक रद्द करावे लागतील. आपल्या तब्येतीच्या आज तक्रारी राहतील. आपल्यालामिळणार्या अनुकूल संधी अचानक हुकतील. नवीन कल्पना आकार घेतील. सतत  शुभशकुनांचा सतत प्रत्यय येईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांना यश देईल.

कर्क : आपल्या व्यवसायातील जुनी येणी काही प्रमाणात वसूल होण्याचे योग आहेत. आज आपले कार्यक्षेत्र वाढण्याचीसंभावना आहे. त्यासाठी आपणांस विचारपूर्वक गुंतवणूकीचा निर्णय घ्यावा लागेल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील.

सिंह : कौटुंबिक वादात संयम पाळा. आपली मते जोडीदारावर लादू नका. उधारी उसनवारीचे व्यवहार टाळा. आपली आजवर रेंगाळलेली कामे प्रतिष्ठित व्यक्तिंच्या सहकार्याने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.

कन्या : आपल्या संततीच्या परदेश प्रवासाच्या दृष्टीने काही अडचणी उद्भवतील. अपेक्षित गाठीभेटी घडल्यामुळे आप्तस्वकियांचेसहकार्य लाभेल आज मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे टाळावे. उद्योग व्यापारात नवीन काही प्रकल्प, योजना करण्यास चांगला काळ आहे. अनुकूल घडामोडी घडतील.

तूळ : प्रिय व्यक्तिंच्या भेटीगाठी झाल्यामुळे विचारांची देवाणघेवाण करता येईल. आर्थिक उलाढालीच्या दृष्टीने कोणतेहीमहत्वाचे निर्णय घेऊ नका. जोडीदाराशी महत्वाच्या विषयावर चर्चा करताना मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्या. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे.

वृश्चिक : पूर्वी आपण केलेल्या चांगल्या कामाची वरिष्ठ प्रशंसा करतील. आपले कामातील अधिकार वाढण्याच्या दृष्टीने तीआपल्याला मिळालेली पोच असेल. आजचा दिवस आपल्याला मोठी खरेदी करण्यास अनुकूल आहे. प्रलोभनातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहते. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल.

धनू : उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याच्या संधी येतील. व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल.

मकर : वाहने चालवताना आज खबरदारी घ्यावी. संसर्गजन्य रोगामुळे तब्येतीच्या तक्रारी उद्भवतील आपण वर्तविलेले अंदाज चुकीचे ठरतील. दुसऱ्यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. तब्येतीविषयी डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी करुन घ्या.

कुंभ : भागिदारीत व्यवसाय करणार्यांचे आज कार्यक्षेत्र वाढेल. आपल्याला मिळालेल्या कामामुळे आपल्याला मानसिकस्वास्थ मिळेल. आपले आरोग्य उत्तम राहिल. संततीसंबंधी सुवार्ता कानी येतील.कामानिमित्त प्रवास घडून येतील.नवनवीन अनुकूल घडामोडी घडतील.

मीन : विरोधकांपासून सावध रहा. आपले विचार दुसर्यांना पटवून देण्याच्या दृष्टीने आग्रही वृत्ती धरू नका. आज आपण जास्त शारिरीक कष्ट घेऊ नका. घरात शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. घरातील वातावरण आनंदी राहील. मातृसौख्य लाभेल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 12:07 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 7 december 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, ६ डिसेंबर २०२०
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, ५ डिसेंबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ४ डिसेंबर २०२०
Just Now!
X