मेष

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज एकादशी आहे. साधारण दिवस असल्याने मोठे निर्णय जपून घ्यावेत. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. स्त्रियांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. महादेवाच्या मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – नारंगी

वृषभ

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज एकादशी आहे. जुने मित्र मंडळी भेटतील, भावंडाच्या भेटीचे योग आहेत. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा, ताणतणाव कमी होतील. शिव मानस पूजा करावी.
आजचा रंग – हिरवा

मिथुन

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज एकादशी आहे. साधारण दिवस, प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. मित्र मंडळीत आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. गणपतीची उपासना करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग- पांढरा

कर्क

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज एकादशी आहे. जुने मित्र मंडळी भेटतील. वाहने जपून चालवावीत. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. जुने मित्र मंडळी भेटतील. भावंडाच्या भेटीचे योग आहेत. कालभैरवाष्टक सकाळ-संध्याकाळ म्हणणे.
आजचा रंग – पिवळा

सिंह

कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. ताणतणाव कमी होतील. नवीन जुने मित्र- मैत्रिणी भेटतील. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेचे व्यवहार जपून करावेत. शिव मानस पूजेचे वाचन करावे.
आजचा रंग- गुलाबी

कन्या

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज एकादशी आहे. वाहने जपून चालवावीत, कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. महादेवाचे दर्शन घ्यावे. एकमूठ तांदूळ अर्पण करावे.
आजचा रंग – लाल

तुळ

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज एकादशी आहे. वादविवाद वाढवू नका. साडेसातीच्या शेवटी या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. कामात उत्साह जाणवेल. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. आवडीची माणसं भेटतील ताणतणाव कमी होईल. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग- पांढरा

वृश्चिक

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज एकादशी आहे. साधारण दिवस असल्याने नोकरी व्यवसायाचे निर्णय सावधपणे घ्यावेत, आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. काही दिवसांचा वेळ मागून घ्यावा. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. ओम महालक्ष्मेय नमः या मंत्राचा जप दिवसभर करावा.
आजचा रंग- आकाशी

धनु

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज एकादशी आहे. साधारण दिवस आहे. सर्व कामांचा पाठपुरावा करावा. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. स्त्रियांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल.
आजचा रंग – तपकिरी

मकर

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. महत्त्वाच्या कामासाठी उत्तम दिवस आहे. सर्व कामांचा पाठपुरावा करावा. कामांत उत्साह जाणवेल. आर्थिक ताण कमी होतील. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ओम शांभवे नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – नारंगी

कुंभ

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मोठे अधिकार असलेल्या व्यक्तिंना उत्तम ग्रहयोग आहेत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. आज सकाळी आणि संध्याकाळी धूप लावून विष्णू सहस्त्र नामाचा पाठ करावा.
आजचा रंग – राखाडी

मीन

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहनांची काळजी घ्यावी. शक्यतो दूरचे प्रवास टाळावेत. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. ताणतणाव कमी होतील. महादेवाच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावे.
आजचा रंग – निळा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu