• मेष:-तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. भावंडांशी खेळीमेळीचे वातावरण राहील. दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यावा. विरोधकांपासून सावध राहावे. मुलांची प्रगती होताना दिसेल.
  • वृषभ:-सहकार्‍यांशी असणारा वाद संपुष्टात येईल. मित्रपरिवाराची अपेक्षित मदत मिळेल. कलाकार मंडळींची प्रगती होईल. बौद्धिक कामे करणार्‍यांना चांगली संधी मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वी होतील.
  • मिथुन:-राजकारणापासून दूर राहावे. नोकरी निमित्त प्रवास करावा लागेल. वाहन जपून चालवावे. क्षुल्लक कारणांवरून रूसवे फुगवे संभवतात. नसते साहस करू नका.
  • कर्क:-कलाकारांचे मनोरथ पूर्ण होईल. सहकुटुंब तीर्थयात्रेचा योग येईल. मुलांच्या शुभ वार्तेने कान सुखावतील. आनंदाच्या भरात हुरळून जाऊ नका. जोडीदाराला अचानक लाभ संभवतो.
  • सिंह:-कामानिमित्त बराच प्रवास करावा लागेल. पैशाचा अपव्यय होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. पर्यटनाचा विचार मनात येईल. घराचे सुशोभीकरण काढाल.
  • कन्या:-पदोन्नतीचे योग संभवतात. आर्थिक गरज पूर्ण होईल. कोणतेही गोष्ट अती करू नये. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. आलेल्या संधीचे सोने करावे.
  • तूळ:-सांस्कृतिक कामात सहभाग घ्याल. मुलांना उल्लेखनीय प्रशस्तिपत्रक मिळेल. कोणत्याही गोष्टीच्या जास्त खोलात जाऊ नका. जोडीदाराचे मत तुम्हाला पटणार नाही. बेफिकिरपणे वागू नका.
  • वृश्चिक:-तुमच्यातील कलागुणांची वाढ होईल. प्रेमप्रकरणात सावधानता बाळगा. योग्यायोग्याची खात्री करावी. तुमचा अंदाज अचूक ठरेल. मौज मजेकडे कल राहील.
  • धनू:-वाहन विषयक कामे निघतील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. व्यवसायिक ठिकाणी मन लावून काम करावे. कौटुंबिक सुख-शांति जपावी. अनिष्टता टाळण्याचा प्रयत्न करावा.
  • मकर:-आर्थिक कोंडी सोडवावी लागेल. व्यवसायिकांनी सजगता दाखवावी. वारसाहक्काच्या कामांतून लाभ संभवतो. कागदपत्रांवर विचारपूर्वक सह्या कराव्यात. कौटुंबिक ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा.
  • कुंभ:-प्रकृतीची हेळसांड करू नये. जोडीदाराचे वर्चस्व राहील. मेहनतीत कसूर करू नका. वेळेचे मोल लक्षात घ्यावे. सामाजिक सेवेत पुढाकार घ्याल.
  • मीन:-चांगला आर्थिक लाभ होईल. मोहापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मित्रपरिवारात वाढ होईल. कोणावरही विसंबून राहू नका. मुलांची काळजी लागून राहील.